MI vs KKR, IPL 2020: इयन मॉर्गन-पॅट कमिन्सच्या जोडीने सावरला KKRचा डाव, मुंबई इंडियन्स समोर विजयासाठी दिले 149 धावांचे लक्ष्य
टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत पॅट कमिन्स आणि इयन मॉर्गन यांच्या भागीदारीने केकेआरला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 148 धावांपर्यंत मजल मारून दिली आणि एमआयसमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवले. पॅट कमिन्सने सर्वाधिक नाबाद 53 धावा केल्या.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आजच्या आयपीएल सामन्यादरम्यान एमआय गोलंदाजांपुढे केकेआर फलंदाजांनी लोटांगण घातले. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत पॅट कमिन्स आणि इयन मॉर्गन यांच्या भागीदारीने केकेआरला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 148 धावांपर्यंत मजल मारून दिली आणि एमआयसमोर 149 धावांचे लक्ष्य ठेवले. पहिले फलंदाजी करत केकेआरसाठी शुभमन गिलने 21, पॅट कमिन्सने सर्वाधिक नाबाद 53 धावा केल्या. आंद्रे रसेलने 12, कर्णधार इयन मॉर्गनने नाबाद 39 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, विजयरथावर स्वार असलेल्या मुंबईच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा केला आणि नाईट रायडर्सना धावांवर रोखले. राहुल चाहरने 2 तर ट्रेंट बोल्ट, नॅथन कोल्टर-नाईल, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. मुंबई इंडियन्स 10 गुणांसह आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या तर नाईट रायडर्स 8 पॉईंट्ससह चौथ्या स्थानावर आहेत. (MI vs KKR, IPL 2020: दिनेश कार्तिकने इयन मॉर्गनला केकेआरचे नेतृत्व करण्यास कसे सांगितले? नव नियुक्त KKR कॅप्टनने केले उघड)
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या कोलकाता संघासाठी दमदार सुरूवात करण्याच्या हेतूने आलेला राहुल त्रिपाठी स्वस्तात बाद झाला. 7 धावांवर फलंदाजी करताना सूर्यकुमार यादवने त्याचा बोल्टच्या ओव्हर अप्रतिम झेल टिपला. नितीश राणाही 5 धावा करून कोल्टर-नाईलच्या चेंडूवर क्विंटन डी कॉककडे कॅच आऊट झाला. त्यानंतर राहुल चाहरने एकाच ओव्हरमध्ये दोन नाईट रायडर्स फलंदाजांना माघार धाडले. पहिले 21 धावा करून खेळणाऱ्या शुभमनला किरोन पोलार्डकडे झेलबाद केले, त्यानंतर पुढील चेंडूवर केकेआरचा माजी दिनेश कार्तिकला स्वस्तात तंबूत पाठवले. 12 धावांवर रसेल बुमराहचा शिकार बनला. त्यानंतर कर्णधार मॉर्गन आणि कमिन्सच्या 87 धावांच्या भागीदारीने कोलकाताचा डाव सर्वाला आणि संघाला 148 धावांपर्यंत मजल मारून दिली. कमिन्सने अखेरच्या दोन ओव्हरमध्ये चौकार-षटकारा ठोकले. बुमराहच्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर डी कॉकने कमिन्सचा झेल सोडला. या दरम्यान कमिन्सने 35 चेंडूत टी-20 क्रिकेटमधील पहिले अर्धशतक ठोकले. अखेरच्या ओव्हरमध्ये कमिन्स आणि मॉर्गनने 22 धावा लुटल्या.
यापूर्वी, आजच्या सामन्यात कोलकाता संघ नवीन कर्णधारासह मैदानावर उतरला आहे. मॉर्गनने कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात प्रभावित केले तर कार्तिकच्या अपयशाची मालिका सुरूच राहिली. टीम कठीण स्थितीत असताना मॉर्गन पुढाकार घेतला आणि मुंबईच्या घातक गोलंदाजांपुढे संयमाने फलंदाजी केली.