MI vs DC, IPL 2020 Qualifer 1: दिल्ली कॅपिटल्सचे 3 गडी शून्यावर माघारी; ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराहने मुंबई इंडियन्ससाठी केली तुफानी सुरुवात
अशा स्थितीत दिल्लीने शून्यावर 3 विकेट गमावल्या. पृथ्वी, धवन आणि अजिंक्य रहाणे भोपळाही न फोडता माघारी परतले.
IPL 2020 Qualifer 1: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) टॉस गमावून पहिले फलंदाजी करत 200 धावा केल्या आणि दिल्ली कॅपिटल्ससमोर (Delhi Capitals) 201 धावंच तगडं आव्हान ठेवलं. आजच्या सामन्यातील विजयी संघ थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवेल, त्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससाठी शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) जोडीने डावाची सुरुवात केली, पण मुंबई इंडियन्सचे वेगवान गोलंदाज दिल्लीच्या आघाडीच्या फलंदाजांवर भारी पडले. अशा स्थितीत दिल्लीने शून्यावर 3 विकेट गमावल्या. पृथ्वी, धवन आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भोपळाही न फोडता माघारी परतले. मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला पहिल्याच ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने दोन धक्के दिले. बोल्टने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर पृथ्वीला आणि पाचव्या चेंडूवर रहाणेला शून्यावर माघारी धाडलं. (IPL 2020: DC विरुद्ध रोहित शर्मा 'गोल्डन डक'वर बाद; मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने केली हरभजन सिंह, पार्थिव पटेलच्या 'नकोशा' रेकॉर्डची बरोबरी)
यानंतर जसप्रीत बुमराहने ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर यंदा आयपीएलमध्ये सलग दोन शतकं करणाऱ्या शिखर धवनचा त्रिफळा उडवला. अशाप्रकारे मुंबईच्या वेगवान जोडीने दिल्लीविरुद्ध दमदार सुरुवात करून दिली. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सूर्यकुमार यादवने सर्वप्रथम अर्धशतक ठोकले आणि त्यानंतर त्यानंतर इशान किशनने 30 चेंडूत 55 धावांची नाबाद खेळी केली. संघाने 200 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या फलंदाजीबद्दल बोलायचे तर त्यांची 0/3 अशी निराशाजनक स्थिती झाली होती. इथे पाहा दिल्लीच्या परिस्थितीवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:
किस्मत बदलली नाही
मीम
अजून एक
अखेरचे
दरम्यान, सध्या कृणाल पांड्याने दिल्लीला पाचवा धक्का दिला आणि रिषभ पंतला सूर्यकुमार यादवकडे कॅच आऊट केले. कृणालने 41च्या धावसंख्येवर 3 धावांवर माघारी धाडलं.