MI vs DC, IPL 2020 Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

यामधील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जबरदस्त सामना खेळला जाईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे.

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

MI vs DC, IPL 2020 Live Streaming: आयपीएलध्ये (IPL) रविवार, 11 ऑक्टोबर रोजी चौथा डबल हेडर खेळला जाईल. यामधील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात जबरदस्त सामना खेळला जाईल. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असलेल्या दोन्ही संघांची आघाडीची फलंदाजी जबरदस्त आणि मधली फळी अत्यंत मजबूत आहे. या सह दोन्ही संघांची गोलंदाजीही आक्रामक आहे. भारतीय वेळेनुसार आज 11 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:00 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होईल. या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेल आपल्या ग्राहकांसाठी काही विशेष ऑफर घेऊन आले आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन लाईव्ह मॅचचा आनंद लुटू शकतात. (IPL 2020 Mid-Season Transfer: मुंबई इंडियन्सच्या 'या' 3 खेळाडूंचे होणार मिड-सीजन ट्रांसफर? एका विदेशी क्रिकेटरसाठी रंगू शकते चढाओढ)

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना अबू धाबी येथे खेळला जाईल. आजच्या सामन्यात विजय मिळवून दिल्ली प्ले-ऑफच्या दिशेने एक पॉल उचलतील दुसरीकडे, दिल्लीचा पराभव करून मुंबई इंडियन्स आपला विजयी रथ कायम ठेवून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवून पाहत असेल. दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी जबरदस्त आहे, अशास्थितीत आजच्या सामन्यात चाहत्यांना भरपूर रोमांच पाहायला मिळू शकतो.

पाहा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, क्विंटन डी कॉक, कीरोन पोलार्ड, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, जेम्स पॅटिन्सन, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, क्रिस लिन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, दिग्विजय देशमुख, जयंत यादव, मिशेल मॅकक्लेनाघन, नॅथन कूटर-नाईल, प्रिंस बलवंत राय, सौरभ तिवारी आणि शेरफेन रदरफोर्ड.

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिषभ पंत, कगिसो रबाडा, मार्कस स्टोइनिस, संदीप लामिछाने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेटमायर, डॅनियल सॅम्स, अ‍ॅलेक्स कॅरी, मोहित शर्मा, ललित यादव, आवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, एनरिच नॉर्टजे, हर्षल पटेल आणि कीमो पॉल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif