MI vs DC, IPL 2020 Final Live Streaming: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आयपीएल फायनल लाईव्ह सामना व स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

MI vs DC, IPL 2020 Final Live Streaming: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्रातील अंतिम सामना चार वेळा विजयी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पहिल्या विजेतेच्या शोधात असलेल्या दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जाईल. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) आजचा सामना खेळला जाईल. या मोसमात दोन्ही संघांनी शानदार खेळ केला आहे. साखळी स्टेजमध्ये मुंबई प्रथम तर दिल्लीने दुसरे स्थान मिळवले. दिल्ली संघाने प्रथमच अंतिम फेरी गाठली तर मुंबई त्यांच्या 5व्या जेतेपदाच्या इच्छेने मैदानावर उतरतील. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील फायनल सामना भारतीय वेळेनुसार, आज 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Final: रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स 'या 3 कारणांमुळे पाचव्यांदा बनू शकतात चॅम्पियन)

आयपीएलमध्ये सर्वाधिक चार विजेतेपद जिंकण्याचा विक्रम मुंबईच्या नावावर आहे. दरम्यान, मुंबई आणि दिल्ली यापूर्वी साखळी फेरीत आणि पहिल्या क्वालिफायर सामन्यात आमने-सामने आले होते ज्यात मुंबईने विजय मिळवत वर्चस्व गाजवले होते. अशा स्थितीत आजच्या सामन्यात मुंबईने विजय मिळवल्यास ते दिल्लीविरुद्ध विजयाचा चुकार मारतील. दुसरीकडे, दिल्ली आपले पहिले विजेतेपद मिळवण्याच्या प्रयत्नात असतील.

पाहा मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, क्रिस लिन, मिशेल मॅकक्लेनाघन, नॅथन कोल्टर-नाईल, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, मोहसिन खान, शेरफेन रदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय.

दिल्ली कॅपिटल्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, क्रिस लिन, मिशेल मॅकक्लेनाघन, नॅथन कोल्टर-नाईल, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, मोहसिन खान, शेरफेन रदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय.