MI vs CSK Preview: आयपीएल 2021 हंगामातील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या 27 व्या सामन्याबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहिती आहे काय?

हा सामना सायंकाळी साडेसात वाजता (भारतीय मानक वेळ) सुरु होणार आहे. सायंकाळी 07 वाजता नाणेफेक होईल.

Mumbai Indians vs Chennai Super Kings (Photo Credits: File Image)

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 27 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना चेन्नई सुपर किंग्जशी (Chennai Super Kings) होत आहे. इंडियन प्रीमियर लीग सीझन 14 मधील मुंबई इंडियन्स (MI ) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (CSK) हा सामना (,MI vs CSK) दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना 1 मे (शनिवार) म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार दिनी खेळला जाईल. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात सीएसकेला पाच सामन्यांवरील विजयाची धाव वाढवावी लागेल, तर मुंबई इंडियन्स संघालाही विजयपताका रोवण्यासाठी प्रयत्नशिल असवे लागेल. या आधी आयपीएलच्या चॅम्पियन्स पॉइंट टेबलमध्ये तीन तीन विजयांसह हे संघ चौथ्या क्रमांकावर आहेत. सीएसके सहापैकी पाच विजयांसह टेबलमध्ये आघाडीवर आहे.

MI vs CSK

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांनी या आधी 30 वेळा एकमेकांचा सामा केला आहे. यात मुंबई इंडियन्सने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर 12 विजय सीएसकेच्या नावावर आहेत. या दोन्ही संघामध्ये झालेल्या सामनान्यांपैकी शेवटचे 4 सामने मुंबई इंडियन्सने जिंकले आहेत.

MI vs CSK IPL 2021 Match 27: महत्त्वाचे खेळाडू

मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) हे चेन्नई सुपर किंग्जचे रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja ) आणि मोईन अली (Moeen Ali) हे महत्त्वाचे खेळाडू असतील. या सामन्यात जसप्रीत बुमराह विरुद्ध मोईन अली असा सामना पाहायला मिळू शकतो. तर . रवींद्र जडेजा विरुद्ध किरोन पोलार्ड अशीही एक मजेशीर लढाई आपल्याला पाहायला मिळू शकते. (Rohit Sharma याच्यानंतर ‘हे’ 3 बनू शकतात Mumbai Indians चे कर्णधार, 5-वेळा आयपीएल चॅम्पियनकडे आहेत दमदार पर्याय)

आयपीएल 2021 मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (एमआय विरुद्ध सीएसके) सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना सायंकाळी साडेसात वाजता (भारतीय मानक वेळ) सुरु होणार आहे. सायंकाळी 07 वाजता नाणेफेक होईल.

कुठे पाहाल सामना?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याचे थेट प्रक्षेपण होईल. हा सामना स्टार स्पोर्ट चॅनेलवर पाहायला मिळू शकतो. हा सामना स्टार स्पोर्ट्स 1 / एचडी, स्टार स्पोर्ट्स २ / एचडी, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी / एचडी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 / एचडी, स्टार स्पोर्ट्स १ तामिळ, स्टार स्पोर्ट्स १ तेलुगु, स्टारवर थेट प्रक्षेपीत केला जाईल. स्पोर्ट्स 1 कन्नड आणि स्टार स्पोर्ट्स 1 बांगला चॅनेल टेलिव्हिजनवरही ह सामना दिसेल. दरम्यान, हा सामना चाहते डिस्ने + हॉटस्टार अ‍ॅपवर तसेच वेबसाइटवरही थेट पाहू शकतात. डिस्ने + हॉटस्टारवर ऑनलाईन पाहणाऱ्या चाहत्यांना मात्र काही शुल्क भरावे लागू शकते.



संबंधित बातम्या