MI vs CSK IPL 2021 Match 27: रोहित शर्माने जिंकला टॉस, चेन्नई करणार पहिले बॅटिंग; मुंबईच्या 'पलटन'मध्ये ‘या’ घातक अष्टपैलूची एंट्री
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमातील 27वा सामना दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (फिरोज शाह कोटला मैदान) ही लढत रंगणार आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि चेन्नईला पहिले बॅटिंग करण्यास सांगितले.
MI vs CSK IPL 2021 Match 27: इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमातील 27वा सामना दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर (फिरोज शाह कोटला मैदान) ही लढत रंगणार आहे. आजच्या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली आणि चेन्नईला पहिले बॅटिंग करण्यास सांगितले. दिल्लीच्या स्टेडियमवर होणाऱ्या आजच्या सामन्यासाठी चेन्नई संघात बदल झालेला नाही तर मुंबईमध्ये 2 बदल झाले आहेत. न्यूझीलंडचा तडाखेबाज अष्टपैलू जेम्स नीशमने मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. नॅथन कोल्टर-नाईलच्या नीशमला तर जयंत यादवच्या जागी धवल कुलकर्णीला संधी मिळाली आहे. (IPL 2021: CSK च्या ‘येलो आर्मी’ला नेहमीच नडल्या ‘या’ 3 टीम, पहा एमएस धोनीच्या सुपर किंग्सना सर्वाधिक वेळा पराभूत करणारे संघ)
दोन्ही संघातील आजवरच्या 30 लढतीतीत मुंबई संघ वरचढ राहिला आहे. मुंबईने आतापर्यंत चेन्नईविरोधात 18 सामन्यात विजय मिळवला आहे, तर चेन्नईने 12 सामन्यात मुंबईवर मात केली आहे. दुसरीकडे, आयपीएलच्या 14 व्या मोसमात सीएसके सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आपल्या सलामीच्या सामन्यातील पराभवाला मागे टाकत चेन्नईने 6 सामन्यांपैकी सलग 5 सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे, मुंबईची पलटन’ सुरुवातीपासून धावांसाठी आणि विकेट्साठी धडपताना दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक चांगली फलंदाजी करत आहेत पण मधली फळी सुरुवातीपासून अपयशी ठरत आहे. त्यामुळे चेन्नईच्या घातक संघापुढे त्यांच्याकडून प्रभावी खेळी अपेक्षित असेल. आजच्या सामन्यात चेन्नईची सलामी जोडी रुतुराज-डु प्लेसिस, सुरेश रैना, रवींद्र जडेजा तर गोलंदाजीत दीपक चाहर तर मुंबई संघातील रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, किरोन पोलार्ड, राहुल चाहर यांच्या भूमिकेकडे सर्व चाहत्यांची नजर लागून असेल.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हनः रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, किरोन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, जेम्स नीशम, ट्रेंट बोल्ट, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह आणि राहुल चाहर.
सीएसके प्लेइंग इलेव्हन: एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, सॅम कुरन, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि लुंगी एनगीडी.
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2021 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

