MI vs CSK 1st IPL Match 2020: चेन्नई सुपर किंग्सचा टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय; पाहा कोणाला मिळाले मुंबई, चेन्नईच्या प्लेयिंग XI मध्ये स्थान
यंदा दोन्ही संघांसमोर महत्वाचं आव्हानं म्हणजे मुंबईला संपूर्ण हंगाम लसिथ मलिंगाशिवाय तर चेन्नईला सुरेश रैना आणि हरभजन सिंह, या आपल्या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावं लागणार आहे.
संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे अखेर इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्राचे शुभारंभ होण्यासाठी तयार आहे. हंगामाच्या सलामीच्या सामन्यात गतविजेते मुंबई इंडियन्ससमोर (Mumbai Indians) उपविजेते चेन्नई सुपर किंग्सचे (Chennai Super Kings) आव्हान असेल. सामन्यापूर्वी नाणेफेक दरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यंदा दोन्ही संघांसमोर महत्वाचं आव्हानं म्हणजे मुंबईला संपूर्ण हंगाम लसिथ मलिंगाशिवाय तर चेन्नईला सुरेश रैना आणि हरभजन सिंह, या आपल्या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावं लागणार आहे. सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही टीमने जबरदस्त प्लेयिंग इलेव्हन निवडले आहे. रोहित शर्मा मुंबईचे तर एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नईचे नेतृत्व करताना दिसतील. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) पुन्हा एकदा मुंबईच्या विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळेल. मलिंगाच्या जागी जेम्स पॅटिन्सनला (James Pattinson) मुंबईच्या संघात स्थान मिळाले आहे. (MI vs CSK, IPL 2020 Live Streaming: कधी आणि कुठे बघता येईल मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील पहिल्या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग)
मुंबईकडून पॅटिन्सन हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसह वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल तर राहुल चाहरला फिरकी विभागात कृणाल पांड्याची साथ मिळेल. दुसरीकडे, ड्वेन ब्रावोला यंदा चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हन स्थान मिळाले नाही. चेन्नईने प्लेयिंग इलेव्हनमध्ये मुरली विजय, पियुष चावला आणि लुंगी एनगीडी यांना स्थान दिले आहे. अन्य अपेक्षित खेळाडू प्लेयिंग इलेव्हनमध्ये कायम आहेत. शेन वॉटसन मुरलीसह डावाची सुरुवात करू शकतो. मुंबई संघ कायमच चेन्नईवर भारी पडला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने झाले आहेत. त्यापैकी 18 सामने मुंबईने तर 12 चेन्नईने जिंकले आहेत.
पाहा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचे प्लेयिंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, कुणाल पांड्या, कीरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जेम्स पॅटिन्सन.
चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कॅप्टन), अंबाती रायुडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, केदार जाधव, लुंगी एनगीडी, मुरली विजय, रविंद्र जडेजा, शेन वॉटसन, सॅम कुर्रान, आणि पीयूष चावला.