MI vs CSK IPL 2020 Stats: एमएस धोनीने आयपीएलमध्ये केले विजयाचे शतक; दीपक चाहर, पियुष चावला यांच्याकडूनही विक्रमी कामगिरी
आयपीएल 2020चा पहिल्या सामन्यात सीएसकेने 5 विकेट्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. सीएसकेचा हा विजय कर्णधार एमएस धोनीचा आयपीएलमधील कर्णधार म्हणून 100 वा विजय ठरला. धोनीव्यतिरिक्त दीपक चाहर, पियुष चावला यांनी विक्रमी कामगिरी केली. पाहा आजच्या सामन्यात बनलेले 'हे' रेकॉर्ड.
आयपीएल (IPL) 2020चा पहिला सामना आज, 19 सप्टेंबर रोजी, आबु धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात पार पडला. या सामन्यात सीएसकेने (CSK) 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. हा सामना जिंकण्याबरोबरच चेन्नईनेही गुणतालिकेत 2 महत्त्वाचे गुण मिळवले आहेत. दरम्यान, सीएसकेचा हा विजय कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) आयपीएलमधील कर्णधार म्हणून 100 वा विजय ठरला. सीएसकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पहिले फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईने 9 विकेट्स गमावत 162 धावा केल्या. मुंबईने दिलेले हे आव्हान सीएसकेने 5 विकेट्स गमावत 166 धावा करत पूर्ण केले. सीएसकेकडून अंबाती रायडूने (Ambati Rayudu) 48 चेंडूत सर्वाधिक 17 धावा केल्या. यात 3 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. सोबतच फाफ डू प्लेसिसनेही (Faf du Plessis) उत्कृष्ट फलंदाजी करत 44 चेंडूत 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. (MI vs CSK IPL 2020: अंबाती रायुडू, फाफ डु प्लेसिसच्या अर्धशतकाने चेन्नई सुपर किंग्सचा एकहाती विजय, मुंबई इंडियन्स 5 विकेट पराभूत)
'कॅप्टन कूल' म्हणून प्रसिद्ध असलेला धोनी आयपीएलमधील कोणत्याही संघासाठी 100 सामने जिंकणारा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी या टी-20 लीगमध्ये अद्याप कोणत्याही कर्णधाराने ही कामगिरी केलेली नाही. कर्णधार म्हणून धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 105 सामने जिंकले आहेत, ज्यामध्ये 5 सामने राइजिंग पुणे सुपरजायंटसाठी जिंकले आहेत. दरम्यान, धोनीव्यतिरिक्त दीपक चाहर, पियुष चावला यांनी विक्रमी कामगिरी केली. पाहा आजच्या सामन्यात बनलेले 'हे' रेकॉर्ड:
1. युएईमध्ये मुंबई इंडियन्सचा हा सलग सहावा पराभव आहे. यापूर्वी युएई,ऍडजे खेळल्या गेलेल्या सर्व 5 सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
2. रोहित शर्माची विकेट पियुष चावलासाठी विक्रमी ठरली. रोहितला बाद करताच चावलाने आयपीएलमध्ये हरभजन सिंहच्या 150 विकेटचा टप्पा गोलंदाजला आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला.
3. आयपीएलच्या मागील 5 सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ मुंबई इंडियन्सकडून पराभूत होत होता, पण या सामन्यात चेन्नईने विजय मिळवून हा क्रम मोडला आहे.
4. मुंबई इंडियन्स स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत हा सलग 8 वा पराभव होता. आयपीएल स्पर्धेत जर मुंबई इंडियन्सने सलामीचा सामना खेळला तर त्यांना तो जिंकता आला नाही.
5. टी-20 क्रिकेटमध्ये महेंद्र सिंह धोनी आज 250 डिसमिसल करणारा पहिला विकेटकीपर ठरला.
6. दीपक चाहरने आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. आजवर असा विक्रम करण्याची संधी कोणत्याही गोलंदाजाला मिळाली नाही.
7. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सलामीला फलंदाजीला येत सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात आजवर कोणत्याच फलंदाजाने पहिल्या सामन्यातील पहिल्या चेंडूवर चौकार मारला नाही.
मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यात फाफ डु प्लेसिस आणि अंबाती रायुडू यांनी अर्धशतकी कामगिरी करत सीएसकेला एकहाती विजय मिळवून दिला. सीएसकेचा पुढील सामना राजस्थान रॉयल्सशी तर मुंबईसमोर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान असेल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)