MI vs CSK IPL 2020 Funny Umpire Jokes: अंपायर मुंबई इंडियन्स टीमचा होता का? ट्विटरवर मजेदार फोटो शेअर करून यूजर्सने लुटला आनंद

इंडियन प्रीमिअर लीगच्या सलामी सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मॅच दरम्यान न्यूझीलंडचे अंपायर क्रिस गफ्फनीला मुंबई इंडियन्सचा अंपायर म्हणून ब्रॉडकास्टर्सच्या मोठ्या चुकीचा अंदाज आल्यानंतर मुंबई इंडियन्स ऑनलाइन ट्रोल करण्यात आले. सामन्याच्या सुरूवातीस झालेल्या मोठ्या गोंधळामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांनी तातडीने मुंबई इंडियन्सकडे निशाणा साधला.

क्रिस गफ्फनी (Photo Credits: Twitter)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) सलामी सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) मॅच दरम्यान न्यूझीलंडचे अंपायर क्रिस गफ्फनीला (Chris Gaffaney) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) अंपायर म्हणून ब्रॉडकास्टर्सच्या मोठ्या चुकीचा अंदाज आल्यानंतर मुंबई इंडियन्स ऑनलाइन ट्रोल करण्यात आले. आयपीएल (IPL) 2020 च्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी झाला आणि सीएसकेने (CSK) चार वेळच्या विजेत्यांचा पराभव करून आयपीएल 2020 ची मोहीम विजयासह सुरू केली. मात्र सामन्याच्या सुरूवातीस झालेल्या मोठ्या गोंधळामुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांनी तातडीने मुंबई इंडियन्सकडे निशाणा साधला आणि या चुकीमुळे आयपीएल टीमला ट्रोल केले. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली जेव्हा खेळाडू व अंपायर मैदानात उतरले. (MI vs CSK IPL 2020 Stats: एमएस धोनीने आयपीएलमध्ये केले विजयाचे शतक; दीपक चाहर, पियुष चावला यांच्याकडूनही विक्रमी कामगिरी)

अंपायर मैदानात उतरले आणि स्टार स्पोर्ट्सच्या प्रसारकांनी त्यांचा परिचय चाहत्यांशी करून दिला. पडद्यावर पंचांची नावे चमकायला लागली. भारतीय अंपायरची अचूक ओळख करून दिली असली तरी खळबळजनकपणे क्रिस गफ्फनीला मुंबई इंडियन्सचा अंपायर म्हणून दाखवले. हा गोंधळ लक्षात येत चाहत्यांनी तातडीने ट्विटरवरुन मुंबई इंडियन्स आणि आयपीएल आयोजकांना चुकीबद्दल ट्रोल केले.

क्रिस गफ्फनी मुंबई इंडियन्स अंपायर?

मुंबई इंडियन्सने अंपायर आणला

मुंबई इंडियन्सने सीएसके सामन्यासाठी अंपायरआणले?

सॉरी! अंपायरने आज आपले काम केले नाही...

मुंबई इंडियन्स 12 वा खेळाडू

अंपायर देखील मुंबई इंडियन्सला वाचवू शकले नाही...

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव केला आणि आयपीएल 2020 ची मोहीम अप्रतिम विजयाने सुरू केली. पहिले फलंदाजी करण्यासाठी सांगितल्यावर मुंबई इंडियन्सने बॅटने खराब प्रदर्शन केले आणि 9 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. प्रत्यत्तरात चेन्नई सुपर किंग्सचे 4 चेंडू शिल्लक असताना 166 धावा करून लक्ष्य गाठले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now