MI vs CSK, IPL 2019 Qualifier 1 Live Cricket Streaming: मुंबई इंडिन्स विरुद्ध चैन्नई सुपर किंग्ज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
तसेच 2010 पासून धोनीचा संघ मुंबईविरुद्ध आयपीएलमध्ये जिंकू शकला नाही. त्यामुळे या वेळी चाहत्यांच्या आपेक्षा आणि जबाबदारी अशी दूहेरी जबाबदारी धोनीला पार पाडावी लागणार आहे.
MI vs CSK, IPL 2019 Qualifier 1 Live Cricket Streaming: आयपीएल 2019 चा थरार आता शेवटच्या टप्प्यात आला असून, हळूहळू पूर्णत्वाकडे निघाला आहे. यंदा आयपीएलचे 12 वे पर्व होते. या पर्वातील उपांत्यपूर्व फेरीही सुरु झाली असून या फेरीतील पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) या दोन संघात होत आहे. चेन्नई (Chennai) येथील एमए चिदंबरम स्टेडीयम (MA Chidambaram Stadium) या सामन्यासाठी चाहत्यांनी तुडूंब भरू लागले आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाच्या रुपात या पर्वातील पहिला फायनलीस्ट आपल्याल्या मिळेल. तर, पराभूत होणाऱ्य़आ संघाला एलिमिनेटर सामन्याच्या विजेत्यासोबत टक्कर द्यावी लागेल. आजच्या सामन्याबाबत उत्सुकता इतकीच की, गुणतालीकेत अव्वल असणारा मुंबई इंडियन्स बाजी मारणार की, आपल्या घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज इतिहास घडवणार. या संघाचा थरार आपण लाईव्हही पाहू शकता. त्यासाठी आपण आम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जरुर पाहू शकता.
कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?
Mumbai Indians vs Chennai Super Kings सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच, Star Sports 1/HD, Star Sports 1 Hindi/HD, Star Sports Select 1/HD या चॅनलवर देखील तुम्हाला लाईव्ह सामना पाहता येईल. यासोबतच आपल्याला जर या सामन्याचे लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करु शकता.
आयपीएल इतिहास पाहता एमएम चिदंबरम स्टेडीयमवर मुंबई इंडियन्स संघासमोर चेन्नई संघाची कामगिरी आजवर म्हणावी तितकी चांगली राहिली नाही. तसेच 2010 पासून धोनीचा संघ मुंबईविरुद्ध आयपीएलमध्ये जिंकू शकला नाही. त्यामुळे या वेळी चाहत्यांच्या आपेक्षा आणि जबाबदारी अशी दूहेरी जबाबदारी धोनीला पार पाडावी लागणार आहे.
मुंबई विरुद्ध नॉकआउट सामन्याबाबत सांगायचे तर, धोनी आणि रैनाची कामगिरी चांगली राहीली आहे. धोनीचा संघ मुंबईविरुद्ध नॉकआउट सामन्यात सरासरी 51 राहिला आहे. तर, रैनाची सरासरी कामगिरी 61.50 इतकी राहिली आहे. मुंबईचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याची चेन्नई विरुद्धची कामगिरी भलतीच दमदार राहिली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. (हेही वाचा, IPL 2019: मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा जिंकू शकतो IPL Trophy; ही आहेत कारणं)
CSK आणि MI संभव्य संघ
CSK संभाव्य संघ: शेन वॉटसन, फॉफ डू प्लेसि, सुरेश रैना, अंबाती रायुडू, ध्रवु शौरी, महेंद्र सिंह धौनी (कर्नधार), ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, हरभजन सिंह, दीपक चहर, इम्रान ताहिर.
MI की संभावित टीम: क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, ईशान किशन/इविन लुईस, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, किरोन पोलार्ड, मिलेच मैक्लेघन /अनुकूल रॉय, राहुल चहर, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.