Video: एमएस धोनी चे सिंगिंग सेशन; पार्थिव पटेल, पियुष चावला समवेत बाथरूममध्ये बसून गायली किशोर कुमारची गाणी, व्हिडिओ व्हायरल
क्रिकेटच्या मैदानावर चाहते सध्या भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात तो बाथरूममध्ये बसून गाणे ऐकत आहे. धोनी समवेत पियुष चावला आणि पार्थिव पटेल देखील आहेत आणि ते सर्वजण बाथरूममच्या जमिनीवर बसले आहेत.
क्रिकेटच्या मैदानावर चाहते सध्या भारताचा (India) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला खूप मिस करत आहेत. इंग्लंडमध्ये आयोजित केलेल्या विश्वचषक 2019 मध्ये अंतिम सामना खेळल्यानंतर टीम इंडियामधून बाहेर राहूनही धोनी चर्चेत बनून राहिला आहे. अनेकदा धोनीचे काही व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते आणि यावेळी असेच काहीसे घडले आहे. धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात तो बाथरूममध्ये बसून गाणे ऐकत आहे. धोनी समवेत पियुष चावला (Piyush Chawla) आणि पार्थिव पटेल (Parthiv Patel) देखील आहेत आणि ते सर्वजण बाथरूममच्या जमिनीवर बसले आहेत. व्हिडिओमध्ये धोनी टॉयलेटमध्ये बसला असून गायक ईशान खान (Ishaan Khan) त्याच्या समोर गाणे गाताना दिसत आहे. पुढच्याच क्षणी पियुषसुद्धा खाली बसून गाणे ऐकायला लागला. इशान धोनीसाठी 'मेरे मेहबूब कयामत होगी' हे गाणे गात आहे, ज्याला धोनी खूप एन्जॉय करताना दिसत आहे. (Viral Video: एमएस धोनी चं मालदीव वेकेशन; RP Singh आणि पीयूष चावला यांच्यासाठी बनला पानी पूरी वाला)
वर्ल्ड कप 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात झालेल्या पराभवानंतर धोनी एकही सामना खेळला नाही. एका महिन्यापूर्वी बीसीसीआयने आपली वार्षिक कराराची यादी जाहीर केली होती ज्यातून त्यांनी धोनीला वगळले होते. ज्यामुळे असा अंदाज वर्तविला जात आहे की धोनी यापुढे पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार नाही. मात्र, यावर स्वत: धोनीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. पाहा धोनीच्या सिंगिंग सेशनचा हा मजेदार व्हिडिओ:
दरम्यान, धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी परतणार यावर स्पष्ट माहिती नसली तरी, तो लवकरच आगामी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसेल. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकमध्ये धोनीचा समावेश त्याच्या आयपीएल आणि पुढील कामगिरीवर अवलंबून आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)