IPL Auction 2025 Live

AUS vs BAN 2021: बांग्लादेश दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया टीमला मिळाला नवीन कर्णधार, फिंचच्या जागी ‘या’ धुरंधर फलंदाजाकडे नेतृत्वाची धुरा

संघ बांगलादेशमध्ये पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे.

मॅथ्यू वेड (Photo Credit: Twitter)

Australia Cricket Team: वेस्ट इंडिज दौऱ्यावर यजमान संघाला वनडे मालिकेत लोळवल्यावर ऑस्ट्रेलिया संघ (Australia Team) आता बांग्लादेश दौऱ्यावर (Bangladesh Tour) आहे. संघाचा नियमित कर्णधार आरोन फिंचला (Aaron Finch) दुखापतीमुळे यापूर्वी विंडीज दौऱ्यावर वनडे आणि मग संपूर्ण बांग्लादेश दौऱ्यावरून माघार घ्यावी लागली असल्यामुळे आता संघाचा अनुभवी विकेटकीपर-फलंदाज मॅथ्यू वेड (Matthew Wade) याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे फिंचच्या अनुपस्थितीत विंडीजविरुद्ध वनडे मालिकेत अॅलेक्स कॅरीने कांगारू संघाचे नेतृत्व केले होते. ऑस्ट्रेलियाचा संघ बांगलादेशमध्ये पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका 3 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान होणार असून सर्व सामने ढाका (Dhaka) येथील शेर-ए-बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर (Sher-e-Bangla Stadium) खेळले जातील. (Australia Cricket Team: वेस्ट इंडिज-बांग्लादेश दौऱ्यातून आरोन फिंच याची एक्सिट, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का)

वेडबद्दल बोलायचे तर ऑस्ट्रेलियाच्या टी-20 विश्वचषक मोहिमेच्या दिशेने वाटचाल म्हणून अनुभवी फलंदाज बांग्लादेश दौऱ्यावर खालच्या फळीत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. व्हाईट-बॉल मालिकेतून नियमित उपकर्णधार पॅट कमिन्ससह वरिष्ठ खेळाडूंनी माघार घेल्यामुळे अलेक्स कॅरीने विंडीजविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये फिंचच्या जागी संघाचे नेतृत्व केले होते. पण विश्वचषकाआधी संघाच्या अंतिम टी-20 मालिकेत वेड ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. 33 वर्षीय वेड फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा 11 वा खेळाडू ठरला आहे. वेडने देशांतर्गत स्तरावर कर्णधार म्हणून वेडने व्हिक्टोरिया, तस्मानिया आणि होबार्ट हरिकेन्स संघाचे नेतृत्व केले आहे. दुसरीकडे, कॅरी बांग्लादेशविरुद्ध एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळू शकतो, कारण त्याने अलीकडेच सेंट लुसियातील विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत प्रभावी कामगिरी बजावली होती.

बांग्लादेश दौऱ्यावरील ऑस्ट्रेलिया संघ: अॅश्टन अगर, वेस अगर, जेसन बेहरनडोर्फ, अॅलेक्स केरी, डॅन ख्रिश्चन, जोश हेजलवूड, मोईजेस हेनरिक्स, मिशेल मार्श, बेन मॅकडरमॉट, रिले मेरिडिथ, जोश फिलिप, मिशेल स्टार्क, मिशेल स्वीपसन, अॅश्टन टर्नर, अँड्र्यू टाय, मॅथ्यू वेड (कॅप्टन) , अॅडम झांपा.

रिझर्व्ह खेळाडू: नॅथन एलिल्स, तनवीर संघा.