Marsh Cup: 11 ओव्हरमध्ये 'या' संघाला करायच्या होत्या 5 धावा, रोमांचक मॅचमध्ये 1 धावांनी झाला पराभव, पहा Video
ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे व्हिक्टोरिया आणि तस्मानिया संघात झालेल्या सामन्यात प्रत्येकाला चकित करणारी घटना घडली. या रोमांचकारी सामन्यात व्हिक्टोरियाने तस्मानियावर अवघ्या एका धावांनी विजय मिळविला, पण एकेवेळी संपूर्ण सामना तस्मानियाच्या हातात होता. 16 चेंडूत तस्मानियाने उर्वरित 6 गडी गमावले आणि मॅच 1 धावाने गमावला.
क्रिकेटच्या मैदानावर आजवर आपण अनेक रोमांचक सामने पहिले असतील पण, ऑस्ट्रेलियाच्या घरगुती क्रिकेट हंगामातिल मार्श कप (Marsh Cup) मध्ये असे काही घडले ज्याच्यावर विश्वास ठेवणे कठीणच. असे म्हणतात की क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे, याचे आणखी एक उदाहरण ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणार्या मार्श चषक दरम्यान दिसून आले. पर्थ येथे स्पर्धेचा तिसरा सामना खेळत असताना एका संघाने सामना जिंकलेला सामना गमावला. असे नव्हते की, या स्पर्धेत युवा खेळाडू या स्पर्धेत भाग घेत आहेत, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठे खेळाडू या मॅचमध्ये सहभागी होते. ऑस्ट्रेलियाच्या पर्थ येथे व्हिक्टोरिया (Victoria) आणि तस्मानिया (Tasmania) संघात झालेल्या सामन्यात प्रत्येकाला चकित करणारी घटना घडली. या रोमांचकारी सामन्यात व्हिक्टोरियाने तस्मानियावर अवघ्या एका धावांनी विजय मिळविला, पण एकेवेळी संपूर्ण सामना तस्मानियाच्या हातात होता. (Video: फलंदाजाने मारलेल्या दमदार शॉटवर डोकं वाचवण्याच्या प्रयत्नात तुटले गोलंदाजाच्या हाताचे हाड, पहा)
द मार्श कपमधील तिसर्या सामन्यात व्हिक्टोरियाने प्रथम फलंदाजी करत संपूर्ण संघ 47.5 ओव्हरमध्ये फक्त 185 धावांवर कमी बाद झाला. विल सुदरलँड याने संघासाठी सर्वाधिक 53 धावा केल्या. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यानेदेखील 34 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल, बेन मॅकडर्मोटच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर तस्मानियाला 4 गडी गमावून 172 धावा केल्या. तस्मानियाला विजयासाठी 12 ओव्हरमध्ये 14 धावांची गरज होती. तस्मानियाचा विजय अगदी निश्चित दिसत होता, परंतु त्यानंतरच सामन्याचे रूप पूर्णपणे उलटले. पुढील 16 चेंडूत तस्मानियाने उर्वरित 6 गडी गमावले आणि मॅच 1 धावाने गमावला. शेवटच्या षटकात ट्रायमनने दोन गडी बाद केले आणि व्हिक्टोरियाला एका धावांनी रोमांचक विजय दिला.
डावाच्या 40 व्या ओव्हरमध्ये जॅकसन कोलमनने तीन विकेट्स घेत तस्मानियाला जबरदस्त धक्का दिला. षटकांच्या पहिल्याच चेंडूवर त्याने जेम्स फॉल्कनरला 1 धावांवर हॉलंडच्या हाती झेलबाद केले. पुढच्याच चेंडूवर बेन मैकडरमोटला पुकोव्हस्कीकडे झेल बाद करत त्याने तस्मानियाच्या सर्व आशा मोडीत काढल्या. मॅकडर्मोटने 6 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 78 धावा केल्या. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कोलिमनने गुरिंदर संधूला बाद केले. ट्रिमने 36 धावा देऊन 4 बळी घेतले. कोलमनने 46 धावा देऊन 4 बळी घेतले. विल सुदरलँडने 43 धावांत 2 गडी बाद केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)