क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवीन केंद्रीय कराराची केली घोषणा; मार्नस लाबूशेन In, उस्मान ख्वाजा Out, पाहा पूर्ण लिस्ट
या लिस्टमध्ये मार्नस लाबूशेन आणि जो बर्न्स समवेत 6 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, बर्याच काळापासून क्रिकेट ऑस्ट्रेलियाबरोबर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेल्या उस्मान ख्वाजा याला या यादीतून वगळण्यात आले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2020-21 हंगामात मध्यवर्ती करारात सामील झालेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर केली आहे. या लिस्टमध्ये मार्नस लाबूशेन (Marnus Labuschagne) आणि जो बर्न्स (Joe Burns) समवेत 6 नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, बर्याच काळापासून क्रिकेट ऑस्ट्रेलियाबरोबर सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेल्या उस्मान ख्वाजा याला या यादीतून वगळण्यात आले आहे. शॉन मार्श यालादेखील सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये जागा मिळाली नाही. ख्वाजा गेल्या पाच वर्षांत प्रथमच या यादीतून बाहेर पडला आहे. ख्वाजा आणि मार्श व्यतिरिक्त पीटर हँडसकॉम्ब, मार्कस हॅरिस, नाथन कूल्टर नाइल आणि मार्कस स्टोइनिस यांनाही या यादीतून वगळण्यात आले आहे. करारामध्ये त्यांची जागा लाबूशेन, एश्टन एगर, बर्न्स, मिचेल मार्श, केन रिचर्डसन, मॅथ्यू वेड यांनी घेतली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नवीन केंद्रीय कराराच्या यादीमध्ये 20 पुरुष खेळाडू आणि 15 महिला खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांना पुढील 12 महिन्यांसाठी करारबद्ध करण्यात आले आहे. (Coronavirus: आरोन फिंच याला टी-20 वर्ल्ड कप तीन महिन्यांसाठी स्थगित होण्याची आशंका, जाणून घ्या काय म्हणाला ऑस्ट्रेलियन कर्णधार)
ऑस्ट्रेलियाच्या पुरुष क्रिकेट संघाच्या यादीमध्ये बरीच चकित करणारी नावं पाहायला मिळत आहे. महिला क्रिकेटपटूंच्या यादीत तहलिया मैकग्राचा समावेश केल्यामुळे काहींना आश्चर्य वाटले आहे. मैकग्राने गेल्या वर्षी भारत अ विरूद्ध कर्णधारपद भूषवले होते. टॉप-ऑर्डर महिला फलंदाज निकोल बोल्टन आणि एलिस विलानी यांनी गेल्या 12 महिन्यांतील रँकिंगमधून बाहेर पडल्यानंतर त्यांचा करार गमावले आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुरुष करार यादी: एश्टन एगर, जो बर्न्स, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिंस, आरोन फिंच, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, मार्नुस लाबुशेन, नाथन लॉयन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, टिम पेन, जेम्स पॅटिन्सन, झए रिचर्डसन, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क , मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर आणि एडम जाम्पा.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया महिला करार यादी: निकोला कॅरी, एशले गार्डनर, रेशेल हेन्स, एलिसा हीली, जेस जोनासेन, डेलिसा किमिसन, मेग लॅनिंग, ताहलिया मैकग्रा, सोफी मोलिनक्स, बेथ मूनी, एलिसा पैरी, मेगन शूट, एनाबेल सदरलैंड, टेला व्लाइमेक आणि जॉर्जिया वेयरहाम.