दुलीप ट्रॉफीसाठी निवड न झाल्याने मनोज तिवारी याने निवड समितीवर जोरदार टीका, म्हणला संघात येण्यासाठी काय करावे लागेल!
पण अनुभवी क्रिकेटपटू मनोज तिवारीला तिन्ही संघातून वगळण्यात आले. यावरुन संतप्त मनोज याने ट्विटरद्वारे निवड समितीवर प्रश्न उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) स्पर्धेच्या 2019-20 च्या हंगामासाठी मंगळवारी निवड समितीने तीन संघांची घोषणा केली. 17 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा बंगळुरू येथे खेळवण्यात येणार आहे. यासाठी मंगलवारी भारत ब्लु, भारत ग्रीन आणि भारत रेड संघाची घोषणा करण्यात आली. या तिन्ही संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. पण अनुभवी क्रिकेटपटू मनोज तिवारी (Manoj Tiwary) याला तिन्ही संघातून वगळण्यात आले. यावरुन संतप्त मनोज याने ट्विटरद्वारे निवड समितीवर प्रश्न उपस्थित करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने सलग चार ट्विट करून या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली.
दुलीप ट्रॉफीमध्ये निवड ना झाल्याबद्दल तिवारी म्हणाला की, 'दुलीप ट्रॉफीसाठी संघात निवडलेल्या खेळाडूंमध्ये माझ्या नावाचा समावेश नाही. मला निवड समितीला विचारायचे आहे की दुलीप ट्रॉफीच्या पुढच्या सत्रात मला निवडून येण्यासाठी कोणता निकष घ्यावा लागेल किंवा भारतीय संघात सामील होण्यासाठी काय करावे लागेल, जर तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा.'
तिवारी पुढे म्हणाला की, 'मी येथे माझे रेकॉर्ड आणि आकडेवारी दर्शवित नाही परंतु मला त्यांच्याबद्दल फक्त सांगू इच्छित आहे. मागील वर्षी मी एकमेव फलंदाज होतो ज्याने विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare) आणि देवधर ट्रॉफी (Deodhar Trophy) मध्ये 100 च्या सरासरीने धावा केल्या. आणि त्याचवेळी, भारतीय क्रिकेट इतिहासातील मी एकमेव फलंदाज आहे जो मागील वर्षी 50 ओव्हरच्या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करून रेकॉर्ड बनविले होते.'
दरम्यान, यंदाच्या दुलीप ट्रॉफीसाठी शुबमन गिल (Shubman Gill), फैज फझल (Faiz Fazal) आणि प्रियांक पांचाळ (Priyank Panchal) यां अनुक्रमे भारत ब्लू, भारत ग्रीन आणि भारत रेड संघाचे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.