Malaysia vs Maldives 1st Match Scorecard: ICC पुरुष T20 विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात मलेशियाने मालदीवचा 94 धावांनी केला पराभव, सय्यद अझीझ मुबारकने खेळली कॅप्टन इनिंग
प्रथम फलंदाजी करताना मलेशियाने 20 षटकांत केवळ 3 गडी गमावून 203 धावा केल्या होत्या. मालदीव संघाच्या गोलंदाजांना फारसे यश मिळू शकले नाही
मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध मालदीव राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी पुरुष T20 विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेतील पहिला सामना ब्युमास ओव्हल, क्वालालंपूर येथे खेळला गेला. पहिल्या सामन्यात मलेशियाने मालदीवचा 94 धावांनी पराभव करत शानदार सुरुवात केली. या सामन्यात मलेशियाचा कर्णधार सय्यद अझीझ मुबारक (59) आणि झुबैदी झुल्कीफल (72) यांनी धावांची तुफानी खेळी खेळली. या दोघांशिवाय, सर्व फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला, आणि महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या, ज्यामुळे त्यांच्या संघाला मोठ्या फरकाने विजय मिळवता आला.
मलेशियाने मालदीववर 94 धावांनी केली मात
मालदीवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मलेशियाने 20 षटकांत केवळ 3 गडी गमावून 203 धावा केल्या होत्या. मालदीव संघाच्या गोलंदाजांना फारसे यश मिळू शकले नाही आणि मलेशियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्यात ते अपयशी ठरले. शुनान अली, अझयान फरहत, इब्राहिम हसन यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली आहे.
164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मालदीवचा संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली आला. मलेशियाच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी केल्याने मालदीवने केवळ 109 धावांत 6 गडी गमावले. मलेशियाच्या गोलंदाजांनी सामूहिक प्रदर्शन करत विरोधी फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही. या विजयासह मलेशियाने स्पर्धेत शानदार सुरुवात केली असून विश्वचषकासाठी पूर्ण तयारीने उतरल्याचे त्यांचे इरादे स्पष्ट केले आहेत.