MS Dhoni Shifting to New Zealand?: महेंद्रसिंग धोनी न्यूझीलंडला शिफ्ट होतोय? केआरकेचा धक्कादायक दावा; काय आहे नेमकं सत्य?
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्याबाबतची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेता कमाल रशीद खान (केआरके) ने ट्विट करून असा दावा केला आहे.
MS Dhoni Shifting to New Zealand?: आजकाल क्रिकेट जगतात मोठे क्रिकेटर भारत सोडत असल्याची माहिती समोर येत आहे. आधी विराट (Virat Kohli) नंतर रोहीत (Rohit Sharma) आता त्यातच भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच (MS Dhoni) नाव समोर आल आहे. त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह न्यूझीलंडमध्ये स्थायिक होण्याची तयारी करत आहे. चित्रपट अभिनेता आणि सोशल मीडियावर सक्रिय कमाल रशीद खान (केआरके) यांनी असे म्हटले आहे. केआरकेचा दावा आहे की धोनी त्याच्या कुटुंबाची आणि मुलीच्या अभ्यासाची गोपनीयता लक्षात घेऊन न्यूझीलंडला शिफ्ट होणार आहे.
सझ्या यावर जास्त विचार करण्याती गरज नाही. कारण, हा फक्त एक दावा आहे. धोनीने याबद्दल कधीही स्पष्टपणे काहीही सांगितले नाही की तो भारत सोडत आहे. परंतु त्याच्या मागील मुलाखतीत, हे निश्चितपणे समोर आले आहे की न्यूझीलंड एक सुरक्षित देश आहे. धोनीची आयपीएल कारकीर्द हळूहळू खराब होत चालली आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाच्या भविष्यातील योजना देखील बदलत आहेत.
भारतीय सेलिब्रिटींबद्दल खळबळजनक दावे करण्यासाठी ओळखले जाणारे कमाल रशीद खान यांनी पुन्हा एकदा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल मोठे विधान केले आहे. केआरकेने त्याच्या एक्स पोस्टमध्ये दावा केला आहे की धोनी न्यूझीलंडला जात आहे. त्याने म्हटले आहे की धोनी आता भारताबाहेर स्थायिक होण्याचा निर्णय घेतलेल्या सेलिब्रिटींचा मार्ग अनुसरला आहे. केआरकेच्या मते, स्टार फलंदाज विराट कोहली लवकरच इंग्लंडला जाऊ शकतो, तर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय आधीच दुबईला गेला आहे.
केआरकेचा दावा:
यूट्यूब व्हिडिओ जिथे एमएस धोनीने म्हटले आहे की त्याला न्यूझीलंडमध्ये राहायला आवडेल: