Indian Cricket Team Full Schedule at ICC World Cup 2023: क्रिकेटचा महाकुंभ 5 ऑक्टोबरपासून होणार सुरू, जाणून घ्या वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

यातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात होणार आहे.

Team India (Photo Credit - Twitter)

आयसीसीने 2023 मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक (ICC World Cup Schedule 2023) जाहीर केले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 19 नोव्हेंबर 2023 रोजी विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल. यातील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड (ENG vs NZ) यांच्यात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात 15 ऑक्टोबरला महान सामना होणार आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक यंदा 10 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. त्यात भारतातील 10 शहरांचा समावेश आहे. हे सामने हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत.

येथे होणार उपांत्य आणि अंतिम सामना

एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर 2023 रोजी मुंबईत खेळवला जाईल. आणि दुसरा उपांत्य सामना 17 नोव्हेंबर 2023 रोजी कोलकाता येथे खेळवला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना होणार आहे. (हे देखील वाचा: ICC Cricket World Cup 2023 Schedule: ठरल तर! भारत - पाकिस्तान सामना होणार 'या' दिवशी, आयसीसीकडून विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर)

'या' फॉर्मेट अंतर्गत ही स्पर्धा आयोजित केली जाईल

आयसीसीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. यातून 8 संघांची निवड करण्यात आली असून, उर्वरित दोन संघांसाठी विश्वचषक पात्रता फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये अ गट आणि ब गटाचा समावेश केला जाईल. त्याच्या फॉरमॅट अंतर्गत, सर्व संघ प्रत्येक संघाविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. त्यानुसार, प्रत्येक संघाला साखळी टप्प्यात एकूण 9 सामने खेळायला मिळणार आहेत. या टप्प्याच्या शेवटी, दोन्ही गटातील अव्वल ४ संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीचे सामने बाद फेरीचे असतील आणि दोन विजेते संघ विजेतेपदाच्या लढतीसाठी आमनेसामने असतील.

विश्वचषक 2023 भारताचे वेळापत्रक

1. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

2. भारत विरुद्ध अफगाणिस्तान

3. भारत विरुद्ध पाकिस्तान

4. भारत विरुद्ध बांगलादेश

5. भारत विरुद्ध न्यूझीलंड

6. भारत विरुद्ध इंग्लंड

7. भारत विरुद्ध क्वालिफायर 2

8. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका

9. भारत वि क्वालिफायर १