LSG vs CSK, TATA IPL 2025 30th Match Live Score Update: लखनौने चेन्नईला दिले 167 धावांचे लक्ष्य, ऋषभ पंतने ठोकले दमदार अर्धशतक
या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दरम्यान, चैन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने चैन्नईसमोर 167 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings, TATA IPL 2025 30th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 30 वा सामना आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात लखनौ भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर येथे खेळवला जात आहे. या हंगामात, लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जची कमान एमएस धोनीच्या खांद्यावर आहे. या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची कामगिरी स्फोटक राहिली आहे. त्याच वेळी, चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दरम्यान, चैन्नईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौने चैन्नईसमोर 167 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
कर्णधार ऋषभ पंतची सर्वाधिक 63 धावांची दमदार खेळी
प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने निर्धारित 20 षटकांत पाच गडी गमावून 166 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून कर्णधार ऋषभ पंतने सर्वाधिक 63 धावांची दमदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 49 चेंडूत चार चौकार आणि चार षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, मिचेल मार्शने 30 धावांचे योगदान दिले.
दुसरीकडे, खलील अहमदने चेन्नई सुपर किंग्ज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. चेन्नई सुपर किंग्जकडून विप्रराज निगम आणि रवींद्र जडेजा आणि यांनी मथीशा पाथिराणा प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकांत 167 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून त्यांच्या खात्यात दोन गुण मिळवायचे आहेत