Look Who's Here! वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडेआधी जसप्रीत बुमराह, पृथ्वी शॉ यांचे टीम इंडियामध्ये पुनरागमन; BCCI च्या फोटोवर यूजर्सने दिल्या मजेदार प्रतिक्रिया

कंबरेच्या दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर असणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अखेर मैदानात परतला आहे. बुमराह मंगळवारी विशाखापट्टणममध्ये टीम इंडियामध्ये सामिल झाला, तिथे त्याने संघासह नेट्समध्ये सराव केला. बुमराह परत आल्यामुळे भारतीय चाहते खूप खुश झाले.

जसप्रीत बुमराह आणि पृथ्वी शॉ नेट्समध्ये (Photo Credits: @BCCI/Twitter)

कंबरेच्या दुखापतीमुळे टीम इंडिया (Team India) बाहेर असणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) अखेर मैदानात परतला आहे. बुमराह मंगळवारी विशाखापट्टणममध्ये टीम इंडियामध्ये सामिल झाला, तिथे त्याने संघासह नेट्समध्ये सराव केला. बीसीसीआयने (BCCI) बुमराहचा फोटो त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला. यामध्ये, बुमराहसह पृथ्वी शॉ आणि टीम इंडियाचे प्रशिक्षक निक वेब यांच्यासह तो दिसत आहे. बुमराहने विशाखापट्टणम (Visakhapatnam) मध्ये टीम इंडियामध्ये सामील होण्याचे कारण म्हणजे तो दुखापतीतून किती बारा झाला आहे हे तपासणे होते. बुमराह दुखापतीतून सावरला असला तरी गोलंदाजी करताना बुमराहला कसे वाटते याकडे आता टीम इंडिया व्यवस्थापन पहात आहे. दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागम करण्याची तयारी करणारा बुमराह फिटनेस टेस्टसाठी आज नेटमध्ये आला होता. (IND vs WI 2nd ODI: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या रेसमध्ये सामिल झाला हा वेस्ट इंडियन फलंदाज, 2019 चा किंग बनण्यासाठी देतोय कठीण लढत)

जुलै ऑगस्टमध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या मालिकेत बुमराहला दुखापत झाली होती. बीसीसीआयने ट्विटरवर बुमराहचा फोटो शेअर करत लिहिले की, "पाहा, येथे कोण आले आहे ते." वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेत बुमराहचा समावेश झाली नाही आहे आणि तो फक्त सरावासाठी परतला होता. बुमराह परत आल्यामुळे भारतीय चाहते खूप खुश झाले. बीसीसीआयच्या पोस्टवर चाहत्यांनी लिहिले, 'टीम इंडियाचा मसीहा परतला आहे.' दुसर्याने म्हटलं की बुमराहने लवकरच टीम इंडियामध्ये परत यावं, टीम इंडियाला त्याची कमतरता जाणवत आहे. दरम्यान, सर्व काही ठीक राहिल्यास बुमराह लवकरच टीम इंडियामध्ये पुनरागमन करू शकेल. टीम इंडियाचा हा गोलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेतून पुनरागमन करू शकतो. भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. पहिला सामना 14 जानेवारी रोजी मुंबईत खेळला जाईल.

पाहा बुमराहच्या फोटोवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

भारतीय क्रिकेटचा तारणारा

बुमराह

बीसीसीआय, पृथ्वी शॉ

तो परत आला आहे. वेलकम बॅक

भारताची गोलंदाजी युनिट आणि भारताचा तारणहार परतला आहे

कसोटी सलामी फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यानेदेखील बुमराहबरोबर सरावासाठी हजेरी लावली. दुखापतीमुळे आणि त्यानंतर 8 महिन्यांच्या बंदीमुळे तोसुद्धा संघातून बाहेर होता. पृथ्वीने नुकतीच सय्यद मुश्ताक अलीमध्ये मुंबई संघाकडून घरगुती क्रिकेट खेळत पुनरागमन केले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now