Lockdown: क्रिकेट सुरू करण्याच्या दिशेने BCCI उचलणार पहिले पाऊल, ‘सेफ झोन’मध्ये खेळाडूंसाठी आयसोलेशन कॅम्प सुरु करण्याच्या तयारीत
क्रिकेटच्या पुनरागमनचा मार्ग मोकळा करण्यासाठी सेफ झोनमधील खेळाडूंसाठी 'आयसोलेशन कॅम्प' आयोजित करण्याचा बोर्ड विचार करीत आहे.
कोविड-19 (COVID-19) संकट काळात भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) क्रिकेट पुन्हा सुरु करण्याच्या उद्देशाने दृष्टीने पहिले मोठे पाऊल उचलण्यास सज्ज आहे. क्रिकेटच्या पुनरागमनचा मार्ग मोकळा करण्यासाठी सेफ झोनमधील (Safe Zone) खेळाडूंसाठी 'आयसोलेशन कॅम्प' आयोजित करण्याचा बोर्ड विचार करीत आहे. जगभरातील लाखो लोकांच्या जिवावर भेटणाऱ्या कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर सर्व क्रिकेट क्रिया स्थगित करण्यात आल्या आहेत. भारतीय टीम अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड दौऱ्यावर खेळले. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यावरील सर्व सामने कोरोनामुळे स्थगित करण्यात आले. तेव्हापासुन मूलभूत व्यायामासह घरामध्ये स्वत:ला फिट ठेवून खेळाडू त्यांच्या घरात कैद आहेत. टाईम्स ऑफ इंडियानुसार बीसीसीआय सेफ झोनमध्ये खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि इतर कर्मचार्यांसाठी प्रशिक्षण सुरू करू शकेल हे सुनिश्चित करण्यासाठी वेगळ्या शिबिराची व्यवस्था करण्याचा विचार करीत आहे. बंगळुरुमधील नॅशनल क्रिकेट अकादमी (NCA) एक संभाव्य ठिकाण म्हणून पाहिले जात आहे परंतु शहरात बरीच प्रकरणे वाढत असल्याने बीसीसीआय यासाठी पर्याय शोधू शकेल. (Lockdown: टीम इंडियाच्या कमबॅकसाठी BCCI ने तयार केला प्लॅन, खेळाडूंसाठी बनवले Exclusive अॅप)
“खेळाडूंची सुरक्षा ही मंडळाची प्राथमिकता असते. आम्हाला लॉजिस्टिकवर काम करावे लागेल आणि बंगलोर पुरेसे सुरक्षित आहे की नाही ते पहावे लागेल. जर गोष्टी पूर्णपणे ठीक दिसत नसतील तर आम्ही देशातील अशा भागात शोधू जे कंटेन्ट झोनच्या बाहेर पडतात. शिबिराची स्वच्छता केली जाईल. ज्येष्ठ खेळाडूंसाठी स्थानिक स्टेडियम सुरू करण्याचा पर्यायही आहे,” असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानेटीओआयला सांगितले.
प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी बीसीसीआय खेळाडू, संघ व्यवस्थापन आणि इतरांच्या संपर्कात आहे. खेळाडूंना पुन्हा एकदा प्रशिक्षण सुरू करता यावे यासाठी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाबरोबरच केटरिंग स्टाफ आणि रूम सर्व्हिस देखील आयसोलेशनमध्ये ठेवले जाईल आणि त्यांच्या बाहेरील जाण्यास प्रतिबंध असेल.