IPL 2020 Auctions Live Streaming: आयपीएल 2020 लिलावाचा लाईव्ह टेलिकास्ट टीव्ही आणि ऑनलाईन पहा Star Sports आणि Hotstar Online वर
आईच्या या लिलावात 8 फ्रँचायझींकडून एकूण 332 खेळाडू वर बोली लावली जाईल. आयपीएल 2020 लिलाव गुरुवारी (19 डिसेंबर) दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. लिलावाचे ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) पुढच्या हंगामाचा लिलाव आज, 19 डिसेंबरला कोलकातामध्ये होणार आहे. आईच्या या लिलावात 8 फ्रँचायझींकडून एकूण 332 खेळाडू वर बोली लावली जाईल. या 332 खेळाडूंपैकी 186 भारतीय (Indian) खेळाडू आहेत, तर 143 विदेशी आहेत. आणि तीन खेळाडू सहयोगी सदस्य आहेत. फ्रॅन्चायझींच्या रकमेबद्दल बोललो तर किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्याकडे सर्वात जास्त रक्कम आहे. पंजाबकडे 42.70 कोटी रुपये आहेत. या पैशातून संघ रिक्त असलेल्या नऊ जागा भरण्याचा प्रयत्न करेल. दोन वेळा विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सकडे 35.65 कोटी रुपये आहेत आणि ते 11 खेळाडूंची रिक्त जागा भारण्यावर लक्ष केंद्रित करतील. दिल्ली कॅपिटल्सकडे 11 खेळाडूंची जागा असून ते 27.85 कोटी रुपयांना खरेदी करतील. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे 12 खेळाडू रिक्त असून त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी 27.90 कोटी रुपये आहेत. (IPL 2020 Auction मध्ये लागणार सर्वात वयस्कर प्रवीण तांबे याचीही बोली, 41 व्या वर्षी केले होते डेब्यू)
आयपीएलच्या (IPL) 13 व्या आवृत्तीला महत्त्व प्राप्त होण्याचे महत्वाचे कारण 2020 चे टी-20 विश्वचषकदेखील आहे. दरम्यान, आयपीएल 2020 लिलाव गुरुवारी (19 डिसेंबर) दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. आयपीएलचा लिलाव सध्या कोलकातामध्ये ठेवण्यात आला आहे. भारतीय चाहते हा लिलाव स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 1 एचडी आणि स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर पाहू शकता. शिवाय, लिलावाचे ऑनलाइन स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.
73 खेळाडूंची रिक्त जागा भरण्यासाठी फ्रँचायझी सुरुवातीच्या काळात सावधगिरी बाळगतील आणि अंतिम फेरीत मोठ्या संख्येने खेळाडूंची विक्री होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, टीम इंडियाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेत प्रभावी खेळी करणाऱ्या शेल्डन कोटरेल याच्यासाठीही चांगली बोली लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.