IND vz NZ U19 World Cup 2020 Live Streaming: भारत अंडर-19 विरुद्ध न्यूझीलंड अंडर-19 विश्वचषक लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports वर

भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषक सामना दुपारी दीड वाजता माणगॉंग ओव्हल, ब्लोएमफोंटेनमध्ये सुरू होईल. नाणेफेक दुपारी एक वाजता होईल.

भारत अंडर-19 विरुद्ध न्यूझीलंड अंडर-19 (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

आयसीसी अंडर-19 वनडे विश्वचषकचे (World Cup) गतजेता भारतीय संघ (Indian Team) आज मैंगुंग ओवल च्या मैदानावर यजमान न्यूझीलंड (New Zealand) अंडर-19 विरुद्ध विजयाची हॅटट्रिक लागावण्याच्या उद्देशाने उतरतील. यापूर्वी गट अ च्या पहिल्या दोन्ही सामन्यात अनुक्रमे श्रीलंका आणि नंतर जपानचा पराभव करत भारताने क्वार्टर-फायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे. गटातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध संघ विजयाची घुडदौड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. चार गुणांसह गटात अव्वल स्थान मिळविणार्‍याभारतीय संघाने पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 90 धावांनी पराभूत करून दुसऱ्या सामन्यात जपानला दहा विकेट्सने पराभूत केले. प्रियम गर्ग याच्या नेतृत्वाखालील संघ न्यूझीलंडविरूद्ध विजयाचा मजबूत दावेदार म्हणून मैदानात उतरेल. भारतासाठी या सामन्यात त्यांचा फॉर्म कायम ठेवणं महत्त्वाचा ठरणार आहे, तर कीवी संघासाठी पुढे जाण्याच्या शर्यत जिंकण्याच्या दृष्टीने सामना महत्वपूर्ण आहे. भारतासाठी त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी महत्वाची ठरणार आहे. (IND vs JPN U19 World Cup 2020: जपानविरुद्ध भारतीय संघाचा 10 विकेटने विजय, अंडर-19 विश्वचषकच्या क्वार्टर फाइनलमध्ये केला प्रवेश)

भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषक सामना दुपारी दीड वाजता माणगॉंग ओव्हल, ब्लोएमफोंटेनमध्ये सुरू होईल. नाणेफेक दुपारी एक वाजता होईल. भारतीय चाहत्यांसाठी सामन्याचा लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर, तर लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग हॉटस्टारवर उपलब्ध असेल.

दुसरीकडे, यजमान किवी संघाचा जपानविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला, मात्र नंतर त्यांनी श्रीलंकेचा पराभव करत अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. न्यूझीलंडने 2018 च्या अंडर-19 विश्वचषकात आठवे स्थान मिळविले होते. आता ते त्यांच्या वरिष्ठ संघाप्रमाणेच कामगिरी करू पाहतील ज्यांनी 2019 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. न्यूझीलंडविरुद्ध होणार सामना भारतासाठी आव्हानात्मक असणार आहे. यशस्वी जयस्वाल फलंदाजांचे नेतृत्व करेल. श्रीलंकेविरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली होती, आणि जपानविरुद्ध त्याने नाबाद 29 धावा केल्या होत्या. अन्य आघाडीचे फलंदाजही फॉर्ममध्ये आहे.

असा आहे भारत-न्यूझीलंडअंडर-19 संघ

भारत अंडर 19: प्रियम गर्ग (कॅप्टन), आकाश सिंह, अथर्व अंकोलेकर, शुभांग हेगड़े, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, कार्तिक त्यागी, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटिल, रवी बिश्नोई, शाश्वत रावत, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, सिद्धेश वीर, दिव्यांश जोशी.

न्यूझीलंड अंडर 19: रियास मारियु, ओली व्हाइट, फर्गस लेलमैन, बेकहम व्हीलर-ग्रीनॉल, जेसी ताशकॉफ़ (कॅप्टन), साइमन कीने, बेन पोमरे, आदित्य अशोक, जॉय फील्ड, क्रिस्टियन क्लार्क, डेव्हिड हॅनकॉक, हेडन डिकसन, क्विन सुंडे, निकोलस लिडस्टोन, विल्यम ओ'रोर्क



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif