Bushfire Cricket Bash 2020 Live Streaming: पॉन्टिंग XI विरुद्ध गिलख्रिस्ट XI बुशफायर क्रिकेट बॅश लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Sony Six वर

हा सामन्याचे थेट प्रसारण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्सवर उपलब्ध असेल. सोनी लिव्ह अँपवर ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहायाला मिळेल.

बुशफायर क्रिकेट बॅश (Photo Credits: Twitter/cricket.com.au)

ऑस्ट्रेलियाच्या (Australia) मेलबर्न येथे रविवार, 9 फेब्रुवारी रोजी बुशफायर क्रिकेट बॅशचा ऐतिहासिक (Bushfire Cricket Bash) सामना ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आग पीडितांना मदत करण्यासाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यात पॉन्टिंग इलेव्हन आणि गिलख्रिस्ट इलेव्हन हे दोन मैत्रीपूर्ण संघ लढतीत एकमेकांच्या आमने-सामने येतील. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) आणि अनुभवी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न चे संघ सामना खेळणार होते, परंतु वेळ आणि स्थान बदलल्यामुळे वॉर्न या सामन्यात भाग घेणार नाही. त्याच्या संघाचे नेतृत्व माजी कर्णधार कांगारू यष्टीरक्षक फलंदाज अ‍ॅडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) करत आहे. या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतील माजी फलंदाज युवराज सिंह गिलख्रिस्ट इलेव्हनकडून खेळेल तर सचिन तेंडुलकर पॉन्टिंग इलेव्हनच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसेल. हा सामना कधी आणि कोठे खेळला जाईल ते जाणून घेऊया. (बुश फायर क्रिकेट बॅशसाठी पॉन्टिंग XI विरुद्ध गिलक्रिस्ट XI घोषित; युवराज सिंह, ब्रायन लारा यांचा प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश)

पॉन्टिंग इलेव्हन विरुद्ध गिलक्रिस्ट इलेव्हन यांच्यातील चॅरिटी सामना मेलबर्नच्या जंक्शन ओव्हल मैदानावर खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 45 मिनिट (09:45 AM) वाजता सुरु होईल. या सामन्याचे थेट प्रसारण भारतीय चाहत्यांसाठी सोनी सिक्सवर उपलब्ध असेल. सोनी लिव्ह अँपवर ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहायाला मिळेल.

 

View this post on Instagram

 

Star-studded squads! 😍 Can't wait for the #BigAppeal!

A post shared by cricket.com.au (@cricketcomau) on

बुशफायर चॅरिटी क्रिकेट सामन्यात पाकिस्तानचे माजी खेळाडू वसीम अकरम , वेस्ट इंडीजचा माजी स्फोटक फलंदाज ब्रायन लारा, कर्टनी वॉल्श आणि ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर हेही सहभागी होत आहे. सामन्यात दोन्ही संघांसाठी 5-5 ओव्हर्सचे पॉवरप्ले असून कोणत्याही गोलंदाजांवर कोणतेही नियम असतील. कोणताही गोलंदाज कितीही ओव्हर्स टाकू शकतो. या सामन्यातून मिळालेला निधी ऑस्ट्रेलियाच्या रेडक्रॉस आपत्ती निवारण आणि पुनर्प्राप्ती निधीला देण्यात येईल. उल्लेखनीय म्हणजे, जंगलात लागलेल्या आगीमुळे 33 लोक मरण पावले आणि हजारो घरांचे नुकसान झाले.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

IND vs AUS 3rd Test 2024 Day 4 Stumps: बुमराह-आकाशने केला चमत्कार, फॉलोऑनचा धोका टळला; चौथ्या दिवसाअखेर भारताच स्कोर 252/9

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना