IND 316/6 in 48.3 Overs (Target 315) | IND vs WI 3rd ODI Live Updates: वेस्ट इंडिजविरुद्ध टीम इंडियाचा विकेट्सने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज दुपारी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा निर्णायक सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघातील मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकण्यात यशस्वी होईल. भारत आणि विंडीजमध्ये ही 10 वी द्विपक्षीय मालिका खेळली जात आहे.

23 Dec, 03:09 (IST)

वेस्ट इंडिजने दिलेल्या 316 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत टीम इंडियाने  कटकमधील तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात विजय नोंदवला आहे. टीम इंडियाने विंडीजने दिले लक्ष्य 4 विकेट आणि 7 चेंडू राखून गाठले. भारताने विंदजीविरुद्धही मालिका 2-1 ने जिंकली. भारताचा विंडीजविरुद्ध हा सलग 10 वा मालिका विजय होता. 

23 Dec, 02:53 (IST)

विजय निश्चित होत असताना भारताला मोठा झटका लागला. किमो पॉलने विराट कोहली 85 धावांवर बोल्ड केले. किमोचीही तिसरी विकेट होती. 

23 Dec, 02:47 (IST)

टीम इंडियाला कटक वनडे विजय मिळवण्यासाठी 30 चेंडूत 38 धावांची आवश्यकता आहे. सध्या विराट कोहली आणि रवींद्र जडेजा क्रीजवर टिकून खेळत आहे. 

23 Dec, 02:19 (IST)

भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. शेल्डन कोटरेल ने भारताला पाचवा धक्का दिला. कोटरेलने केदार जाधवला स्वस्तात पॅव्हिलिअनचा रास्ता दाखवला. जाधव 10 चेंडूचा सामना करत 9 धावा करून बोल्ड झाला.

23 Dec, 02:07 (IST)

भारतीय कर्णधार विराट कोहलीने शानदार एकदिवसीय फलंदाजी करत एकदिवसीय कारकीर्दीतील 55 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. कोहलीने अर्धशतकी खेळी करताना 51 चेंडूत 5 चौकार ठोकले आहेत.

23 Dec, 02:04 (IST)

टीम इंडियाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अवघ्या सात धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. पंतने त्याच्या छोट्या डावात सात चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार ठोकला.

23 Dec, 01:57 (IST)

लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 34.2 षटकांत 200 धावा पूर्ण केल्या. विजयासाठी संघाला आता 116 धावांची गरज आहे आणि संघाकडे अजूनही 94 वा चेंडू बाकी आहेत.

23 Dec, 01:47 (IST)

किमो पॉलने टीम इंडियाला तिसरा झटका दिला. त्याने श्रेयस अय्यर याला 7 धावांवर अलझारी जोसेफकडे झेलबाद केले. भारताचो सुरुवात चांगली झाली असली तरी भारताला सलग दोन झटके असले आहेत. केएल राहुलनंतर श्रेयसही पॅव्हिलिअनमध्ये परतला.

23 Dec, 01:33 (IST)

अलझारी जोसेफ ने भारताला दुसरा झटका दिला. 29 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर जोसेफने केएल राहुलला यष्टीरक्षक निकोलस पुरनकडे झेलबाद केले. राहुलने 77 चेंडूत 89 धावा केल्या. 

23 Dec, 01:23 (IST)

भारतीय संघाने चांगली फलंदाजी करत 27 षटकांच्या समाप्तीनंतर 152 धावा केल्या आहेत. विजयासाठी संघाला आता 23 षटकांत 164 धावांची आवश्यकता आहे. संघाकडून कर्णधार विराट कोहली 18 आणि केएल राहुल 68 धावा करत खेळत आहेत. टीम इंडियाला रोहित शर्माच्या रूपात एकमेव धक्का बसला आहे. रोहितने आज 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. 

23 Dec, 01:19 (IST)

वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने 26 वी ओव्हर टाकली. जेसन होल्डरच्या या षटकात भारतीय फलंदाजांनी चार एकेरींच्या मदतीने एकूण चार धावा केल्या. संघाची धावसंख्या 26 षटकांनंतर 145/1 आहे. कोहली 12 आणि केएल राहुल संघ 67 धावा करत आहे.

23 Dec, 24:56 (IST)

जेसन होल्डरने रोहित शर्मा आणि केएल राहुलमधील 122 धावांची भागीदारी मोडली. रोहित 63 धावांवर निकोलस पुरन कडे कॅच आऊट झाला. 

23 Dec, 24:41 (IST)

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत आपल्या वनडे कारकिर्दीतील 43 वे अर्धशतक पूर्ण केले. शर्मा सध्या 52 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावांवर खेळत आहे. 17.3 ओवरनंतर टीम इंडिया 103/0

23 Dec, 24:33 (IST)

केएल राहुलचे 5 वे वनडे अर्धशतक. वेट्स इंडिजविरुद्ध तिसऱ्या सामन्यात राहुलने 49 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. राहुलने रोहित शर्मा चाय साथीने शतकी भागीदारी पूर्ण केली आहे.

23 Dec, 24:31 (IST)

या सामन्यात भारत विजयाचा उमेदवार आहे. रोहित आणि राहुलने चांगली सुरुवात केली आहे. आता हे पुढे केले पाहिजे. जमिनीवर दव पडण्यास सुरुवात झाली आहे. गोलंदाजी करणे अधिक कठीण होईल. 16 ओव्हरनंतर टीम इंडियाचा स्कोर 100/0. रोहित आणि राहुलची 5 वी शतकी भागीदारी आहे.

23 Dec, 24:11 (IST)

टीम इंडियाने आपल्या पहिल्या पॉवरप्लेमध्ये कोणताही तोटा न करता 59 धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मा 33 चेंडूत पाच षटकारांसह 25 धावा आणि केएल राहुल 27 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 25 धावा करून खेळत आहे.

22 Dec, 23:43 (IST)

टीम इंडियाचा सलामी फलंदाज क्रीजवर आले आहेत. जेव्हा रोहित शर्मा आणि केएल राहुल चांगली सुरुवात करतात तेव्हाच भारताला मोठे लक्ष्य गाठता येते. जेसन होल्डरच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत राहुलने स्वत:चे आणि संघाचे खाते आश्चर्यकारक शैलीत उघडले.

22 Dec, 22:55 (IST)

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेचा अंतिम सामना कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे. यामध्ये वेस्ट इंडिजने पहिले फलंदाजी करत निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 बाद 315 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 316 धावांचे लक्ष्य दिले.  विंडीजकडून निकोलस पूरन आणि कर्णधार किरोन पोलार्ड यांनी सर्वाधिक धावा केल्या. पूरनने 89, तर पोलार्डने 74 धावा केल्या. 

22 Dec, 22:50 (IST)

नवदीप सैनीच्या दुसर्‍या बॉलवर कव्हर्सकडून चौकार मारत विंडीज कर्णधार किरोन पोलार्डने अर्धशतक पूर्ण केले. यानंतर सैनीच्या पुढील चेंडूवर पोलार्डने षटकार मारला. विंडीजचा स्कोर 300 च्या जवळ पोहचला आहे. विंडीजचा स्कोर 299/5

22 Dec, 22:27 (IST)

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 44 वी ओव्हर टाकली. शमीच्या या षटकात कॅरेबियन फलंदाजांनी चार एकेरी आणि एका चौकारांच्या मदतीने एकूण आठ धावा केल्या. संघाची धावसंख्या 234/4 आहे. निकोलस पूरन 58 आणि कर्णधार किरोन पोलार्ड 34 धावा देऊन संघाकडून खेळत आहे.

Read more


भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात आज दुपारी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा निर्णायक सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघातील मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. आजचा सामना जिंकणारा संघ मालिका जिंकण्यात यशस्वी होईल. कटकच्या बाराबती स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात वेस्ट इंडिजविरूद्ध 17 वर्षे अजेय रथ टिकवून ठेवण्याचे आव्हान भारतासमोर असणार आहे. गेल्या 17 वर्षात विंडीज संघ भारतात एकही वनडे जिंकली नाही आहे, त्यामुळे यंदा कॅरेबियन संघ त्यांच्या या विजयाचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करतील. भारत आणि विंडीजमध्ये ही 10 वी द्विपक्षीय मालिका खेळली जात आहे आणि विश्‍वस्त भारतीय संघ (Indian Team) विंडीजविरुद्ध तिसर्‍या वनडे सामन्यात सलग दहाव्या द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारतासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांचे सर्व फलंदाज लयीत आहे विशेषतः मधली फळी- श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत. गेल्या अनेक दिवसांपासून टीकेचा पात्र बनलेल्या पंतने यंदा वनडे मालिकेत प्रभावी फलंदाजी केली आणि टीकाकारांना चोख उत्तर दिले. पण, टीम इंडियाला त्यांच्या फिल्डिंगमध्ये सुधार करण्याची गरज आहे. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

टी-20 नंतर आता वनडे मालिकेतदेखील भारताच्या क्षेत्ररक्षणाने निराश केले. खेळाडूंनी विंडीजच्या प्रमुख फलंदाजांची झेल सोडले. दुसरीकडे, विंडीजने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने सर्वांना प्रभावित केले. विंडीजने टी-20 मालिका गमावली असली तरीही वनडे मालिका जिंकण्यासाठी ते आशावादी आहे. तर, भारतीय संघ आणखी एक मालिका जिंकून वर्षाचा शेवट गोड करू पाहत असेल. या निर्णायक मॅचआधी भाटिया संघात एक बदल झाला आहे. दीपक चाहर याला दुखापत झाली असून त्याच्या जागी नवदीप सैनी याला संघात स्थान देण्यात आली आहे.

असा आहे भारत आणि वेस्ट इंडिज संघ:

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, शिवम दुबे, केदार जाधव, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज: सुनील अंब्रिस, शाई होप, खारी पियरे, रोस्टन चेझ, अलज़ारी जोसेफ, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), शेल्डन कोटरेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि हेडन वॉल्श जूनियर.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now