WI 283/10 in 43.3 Overs (Target 388) | IND vs WI 2nd ODI Live Updates: वेस्ट इंडिजवर 108 धावांनी विजय मिळवत भारताने मालिकेत 1-1 ने केली बरोबरी

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज विशाखापट्टणममध्ये होणार आहे. आणि आजचा सामना भारतीय संघासाठी करो-या-मारोचा सामना आहे.

19 Dec, 02:44 (IST)

टीम इंडियाविरुद्ध विशाखापट्टणम स्टेडियममध्ये सुरु असलेल्या मॅचमध्ये विंडीज संघाचा 108 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने दिलेल्या 388 लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजला 280 धावाच करता आल्या. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने 3 सामन्यांच्या मालिकेत विंडीजसह 1-1 ने बरोबरी केली आहे.

19 Dec, 02:01 (IST)

कुलदीप यादवने वेस्ट इंडिजविरुद्ध हॅटट्रिक घेतली. कुलदीपने शाई होप, जेसन होल्डर आणि अलझारी जोसेफ यांना बाद केले आणि वनडे क्रिकेटमधील दुसरी हॅटट्रिक घेतली.  होपने 78, होल्डर 11 आणि जोसेफ शून्यावर बाद झाला. 

19 Dec, 01:40 (IST)

निकोलस पूरनला बाद केल्यावर मोहम्मद शमीने पुढील चेंडूवर विंडीज कर्णधार किरोन पोलार्ड याला पहिल्याच चेंडूवर पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. यासह विंडीजने 192 धावांवर पाचवी विकेट गमावली. 

19 Dec, 01:38 (IST)

मोहम्मद शमी ने भारताला चौथे यश मिळवून दिले. निकोलस पूरन 75 धावा करून बाद झाला. शमीचा शॉर्ट चेंडू पूल करण्याच्या प्रयत्नातपूरन कुलदीप यादव कडे झेलबाद झाला. 

19 Dec, 01:17 (IST)

भारताने दिलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करत असलेल्या विंडीजच्या 150 धावा पूर्ण झाल्या आहेत. विंडीजने 26 ओव्हरमध्ये 161 धावांवर 3 गडी गमावले आहेत. शेप होप 70 आणि निकोलस पूरन 47 धावांवर खेळत आहेत. 

19 Dec, 01:10 (IST)

रवींद्र जडेजाच्या तिसऱ्या चेंडूवर निकोलस पूरनने हवेत शॉट मारला. यावेळी कॅचची संधी होती, पण, दीपक चाहर कडून कॅच सुटला आणि पूरनला जीवदान मिळाले. यावर विराट कोहली आणि रवींद्र जडेजा चिडले. 

19 Dec, 24:59 (IST)

शाई होपने 59 चेंडूंत 15 वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. या कॅलेंडर वर्षात, होपने 12 व्या वेळी 50 हून अधिक धावा केल्या आहेत. या फलंदाजाने ब्रायन लाराला मागे सोडले आहे. विव्हियन रिचर्ड्सने 13 वेळा हे पराक्रम केले आहेत. यानंतर वेस्ट इंडीजचे 100 धावा 20.5 षटकांत पूर्ण केल्या. 

19 Dec, 24:40 (IST)

भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजाने कॅरेबियन फलंदाज रोस्टन चेसला 4 च्या वैयक्तिक धावांवर बाद टीम इंडियाला तिसरे यश मिळवून दिले. चेसने आज नऊ चेंडूत चार धावा केल्या.

19 Dec, 24:29 (IST)

14 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर वेस्ट इंडिजला दुसरा झटका बसला. चेन्नई मॅचमधील शतकवीर शिमरोन हेटमेयर श्रेयस अय्यरच्या अप्रतिम फील्डिंगचा शिकार बनला. अय्यरने अचूक निशाणा लावत हेटमेयरला धावबाद केले. 

19 Dec, 24:17 (IST)

11 व्या ओव्हरज्या अंतिम चेंडूवर शार्दूल ठाकूर ने भारताला पहिले यश मिळवून दिले. शार्दूलने 30 धावांवर एव्हिन लुईसला पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. 

19 Dec, 24:03 (IST)

भारताने पहिले बॅटिंग करत विंडीजला विजयासाठी 388 धावांचे विशाल लक्ष्य दिले आहे. दीपक चाहरने पहिली ओव्हर टाकली. या ओव्हरच्या तिसरी चेंडूवर केएल राहुल ने स्लिपमध्ये शाई होपचा सोप्पा कॅच सोडला. 

18 Dec, 22:49 (IST)

भारत आणि वेस्ट इंडिज संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम स्टेडियममध्ये खेळला जात आहे. टॉस गमावून पहिले फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 बाद 387 धावा केल्या. आता विंडीजला विजयासाठी 388 धावांची गरज आहे. भारताची सलामीची जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी संघाला साजेशी सुरुवात करून दिली.

18 Dec, 22:40 (IST)

श्रेयस अय्यर याने सलग चौथे वनडे अर्धशतक पूर्ण केले. श्रेयसने 28 चेंडूत अर्धशतक केले. यापूर्वी भारताला चौथा धक्का बसला. रिषभ पंत ने लांब शॉट मारण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली. पंतने 16 चेंडूत 39 धावा फटकावल्या.

18 Dec, 22:31 (IST)

शेल्डन कोटरेल ची ओव्हर वेस्ट इंडिजसाठी महागात पडली. कोटरेलच्या ओव्हरमध्ये रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने 24 धावा लुटल्या. पंतने कोटरेलच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला, तिसऱ्या चेंडूवर चौकार, मग षटकार आणि अखेरीस दोन चौकार लागले. पंत 14 चेंडूत 39 धावांवर खेळत आहेत. 

18 Dec, 22:15 (IST)

अखेर वेस्ट इंडिजला महत्वाची विकेट घेण्यात यश आले. रोहित शर्माची तुफान खेळी संपुष्टात आली. 159 धावांवर शेल्डन कोटरेलने विकेटकीपर शाई होपकडे कॅच आऊट केले. रोहितने या खेळी दरम्यान 17 चौकार आणि 5 षटकार लागले. 

18 Dec, 22:09 (IST)

टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा सध्या त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. पहिले केएल राहुल याच्याबरोबर द्विशतकी भागीदारी आणि आता रोहितने 132 चेंडूत 26 चौकार आणि 8 शतकारांच्या मदतीने 153 धावा पूर्ण केल्या. रोहितने 9 व्यांदा 150 पेक्षा अधिक धावांची नोंद केली आहे. 

18 Dec, 21:51 (IST)

भारतीय सलामीवीर केएल राहुल बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली मैदानात आला आहे. पण या मॅचमधील पहिलाच चेंडूचा सामना करण्यात विराटला अपयश आले. किरोन पोलार्ड पहिल्याच ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर विराटला पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. पोलार्डने विराटला जास्त काळ मैदानावर राहुल दिले नाही आणि भारतीय फलंदाजाच्या पहिल्याच बॉलवर बाद केले. विराट चेन्नई मॅचमध्ये देखील धावा करण्यात अपयशी राहिला होता. पहिल्या वनडेमध्ये विराटने 4 धावा केल्या होत्या. 

18 Dec, 21:45 (IST)

रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची जोडी वेस्ट इंडिजसाठी दुखापत ठरत असताना अलझारी जोसेफने भारताला पहिला झटका दिला. जोसेफने शतकी खेळी करत बॅटिंग करणाऱ्या राहुलला रोस्टन चेसकडे झेलबाद केले. राहुलने 104 चेंडूत 102 धावा केल्या. 

18 Dec, 21:41 (IST)

भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात आपले वर्चस्व कायम ठेवले आहेत. रोहित शर्मा पाठोपाठ केएल राहुल यानेही शतक पूर्ण केले. राहुलने 102 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि 3 षटकार लगावत शतक पूर्ण केले. राहुलचे भारतात खेळतानाचे हे पहिले शतक आहेत. 

18 Dec, 21:32 (IST)

रोहित शर्माचा शो सुरु आहे. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेच्या दुसर्‍या सामन्यात 28 वे वनडे शतक झळकावले. विशाखापट्टणममधील प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा गाठला. रोहितने 107 चेंडूत हे शतक पूर्ण केले. या शतकी डावात त्याने 11 चौकार आणि 2 षटकार लगावले.

Read more


भारत (India) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना आज विशाखापट्टणम (Visakhapatnam) मध्ये होणार आहे. आणि आजचा सामना भारतीय संघासाठी करो-या-मारोचा सामना आहे. रविवारी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीज संघाने यजमान संघाला जोरदार झटका दिला. विंडीज संघाने फलनादजीने शानदार प्रदर्शन करत टीम इंडियाला धूळ चार्ली. चेन्नईतील वनडे सामना जिंकत विंडीजने मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली. त्यामुळे, आजच्या सामन्यात भारतीय संघाकडून एक चूक आणि त्यांनी मालिका गमावली. आजपर्यंत भारतीय संघाने (Indian Team) घरच्या मैदानावर खेळत सलग पाच वनडे सामने कधीही गमावले नाहीत. भारतीय गोलंदाजी चेन्नईमध्ये विखुरलेली दिसत होती. भारताने सहा गोलंदाजांचा वापर केला, परंतु निकाल अनुकूल आला नाही. आजच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये काही बदल होतात कि नाही यावर सर्वांचे लक्ष लागून असेल. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियासाठी आनंदजी बातमी म्हणजे श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत फॉर्ममध्ये परतले आहे. मागील सामन्यात दोन्ही फलंदाजांनी अपेक्षित अशी फलंदाजी केली आणि संघाला कठीण स्थितीतून बाहेर काढले. आजच्या मॅचसाठीदेखील त्यांच्याकडून अशाच खेळीची अपेक्षा असेल. पण, विंडीजच्या फलंदाजांनी पहिल्या मॅचमध्ये केलेली फलंदाजी पाहून त्यांना हल्ल्यात घेतले जाऊ शकत नाही. दुसरीकडे, विंडीजला त्यांच्या गोलंदाजीत सुधार करण्याची गरज आहे. मागील सामन्यात विंडीज गोलंदाजांनी निराश केले. सुरुवातीला काही विकेट घेतल्यावर गोलंदाजांना विकेटसाठी संघर्ष करावा लागला. टीम इंडियाकडे शानदार फलंदाजांची लाईन आहे, त्यामुळे ते मोठा स्कोर करण्यातही सक्षम आहे. विंडीज आजचा सामना जिंकून घरच्या मैदानावरील झालेल्या पराभवाचा बदल घेऊ इच्छित असतील.

असा आहे भारत आणि वेस्ट इंडिज संघ:

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, शिवम दुबे, केदार जाधव, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज: सुनील अंब्रिस, शाई होप, खारी पियरे, रोस्टन चेझ, अलज़ारी जोसेफ, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), शेल्डन कोटरेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेयर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि हेडन वॉल्श जूनियर.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now