AUS 304/10 in 49.1 Overs (Target: 340/6) | IND vs AUS 2nd ODI Live Score Updates: टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर दमदार मात, स्टिव्ह स्मिथ याची 98 धावांची एकाकी झुंज

भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. आजचा सामना जिंकणे टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. आजच्या सामन्यासाठी भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

18 Jan, 03:04 (IST)

पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने दिलेल्या 341 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 304 धावांपर्यंत मजल मारता आली आणि ऑलआऊट झाले. भारताने ऑस्ट्रेलियाचा 36 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ याने सर्वाधिक 98 धावा केल्या, तर मार्नस लाबूशेन याने 46 धावा करून त्याला महत्वाची साथ दिली.  मोहम्मद शमी याने 3 गडी, तर रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नवदीप सैनी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. जसप्रीत बुमराह याला 1 विकेट मिळाली.  

18 Jan, 02:05 (IST)

ऑस्ट्रेलियाची 5 वी विकेट पडली. स्टिव्ह स्मिथला 98 धावांवर कुलदीप यादवने बोल्ड करून ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का दिला. ऑस्ट्रेलिया 221 धावांवर पाचवी विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 70 चेंडूत 119 धावांची गरज आहे. 

18 Jan, 02:02 (IST)

100 एकदिवसीय विकेट्स मिळविणारा कुलदीप यादव तिसरा वेगवान भारतीय खेळाडू ठरला. दुसऱ्या डावाच्या 38 व्या षटकात त्याने अलेक्स कॅरीला 18 धावांवर बाद करत कुलदीपने ही कामगिरी केली

18 Jan, 01:50 (IST)

भारताच्या 341 धावांच्या उद्दिष्टाच्या उत्तरावर अतिथी संघ ऑस्ट्रेलियाने 35 षटकांत 200 धावा पूर्ण केल्या आहेत. शिवाय स्टिव्ह स्मिथची शतकाच्या जवळ पोहचला आहे. स्मिथ 94 चेंडूत 91 धावांवर खेळत आहे. 

18 Jan, 01:33 (IST)

31 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजाने भारताला मोठे यश मिळवून दिले, मार्नस लाबुशेनला 46 धावांवर बाद केलं. यासह जडेजा स्मिथ आणि लाबुशेनची धोकादायक जोडी फुटली.  दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी झाली. 

18 Jan, 01:11 (IST)

भारताने दिलेल्या 341 धावांच्या प्रत्युत्तरात अतिथी ऑस्ट्रेलियाने 25 षटकांत 150 धावा पूर्ण केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ 60 आणि मार्नस ल्युबुशन 33 धावा करून खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 138 चेंडूत 185 धावांची गरज आहे. 

18 Jan, 01:10 (IST)

स्टीव्ह स्मिथने 47 चेंडूत अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 22 षटकांनंतर 132/2 पर्यंत कमी झाली. लब्यूशेन आणि स्मिथने 41 चेंडूत अर्धशतकी भागीदारी केली.

18 Jan, 24:55 (IST)

राजकोट येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारताने दिलेल्या 341 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 20 षटकांनंतर दोन गडी गमावून 121 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ 48 आणि मार्नस लबूशन 17 संघात खेळत आहे.

18 Jan, 24:29 (IST)

भारताचे दुसरे यश मिळाली. रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला विकेटकीपर केएल राहुल कडून स्टंप आऊट केले. फिंचने आज 33 धावांचा डाव खेळला. 

17 Jan, 23:36 (IST)

भारताच्या 341 धावांच्या प्रत्युत्तरात फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया मोहम्मद शमीने पहिला धक्का दिला. तिसरी चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर शमीने धोकादायक डेविड वॉर्नरला 15 धावांवर आऊट केले. मनीष पांडेने जबरदस्त कॅच पकडत वॉर्नरला पॅव्हिलिअनकडे पाठवले. ऑस्ट्रेलियाला 20 धावांवर पहिला धक्का बसला.

17 Jan, 23:31 (IST)

भारताने दिलेल्या 341 लक्ष्याचा प्रत्युत्तर कर्णधार आरोन फिंच आणि सलामी फलंदाज डेविड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली आहे. मात्र, नवदीप सैनीला फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली आहे. 

17 Jan, 22:43 (IST)

ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशामध्ये पहिले फलंदाजी करत भारताने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 6 बाद 340 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात 341 धावांचे लक्ष्य दिले. टीम इंडियाकडून धवन, कर्णधार विराट कोहली आणि केएल राहूल या तीन फलंदाजांनी अर्धशतकी कामगिरी केली. 

17 Jan, 22:34 (IST)

केएल राहुलने 1000 वनडे धावा पूर्ण केल्या. भारताने 350 धावांचा टप्पा गाठायचा असेल तर राहुलला अशाप्रकारे शांत राहून फलंदाजी करावी लागेल. राहुलने या सामन्यात 64 धावा करून हा टप्पा गाठला. 

17 Jan, 22:27 (IST)

46 व्या ओव्हरमध्ये भारताने 300 धावा पूर्ण केल्या. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर केएल राहुलने चौकार ठोकला आणि 38 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

17 Jan, 22:12 (IST)

44 ओव्हरच्या अ‍ॅडम झांपाच्या पहिल्याच चेंडूवर विराट कोहली बाद झाला. त्याने 76 धावा करून विकेट गमावली. अ‍ॅश्टन एगरनेबाऊंड्री लाइनवर सर्वोत्तम झेल पकडला. भारताने 276 धावांवर चौथी विकेट गमावली. 

17 Jan, 22:02 (IST)

राजकोट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध दरम्यान खेळल्या जाणार्‍या दुसर्‍या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 40 षटकांनंतर तीन गडी गमावून 249 धावा केल्या. सध्या संघाचा कर्णधार विराट कोहली 67 आणि केएल राहुल 26 धावा करून खेळत आहेत.

17 Jan, 21:34 (IST)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध राजकोट सामन्यात भारताने 3 विकेट गमावून 200 धावा पूर्ण केल्या आहेत. रोहित शर्मा, शिखर धवन आणि श्रेयस अय्यरच्या रूपात भारताला 3 धक्के लागले. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीनेही 50 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. विराटने 3 चौकार मारत अर्धशतक केले. 

17 Jan, 21:24 (IST)

अ‍ॅडम झांपाने भारताला तिसरा धक्का दिला. झांपाने श्रेयस अय्यरला बोल्ड करून 7 धावांवर पॅव्हिलिअनचा रास्ता दाखवला.झांपाच्या चेंडूवर श्रेयसने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण, चेंडूने त्याला चखमा दिला आणि त्याची विकेट उडवली. 

17 Jan, 21:09 (IST)

वनडे शतकापासून चार धावा दूर असलेल्या शिखर धवनने षटकार मारून टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण केन रिचर्डसने धवनला मिशेल स्टार्ककडे कॅच आऊट करत त्याला नर्वस 90 चा शिकार बनवले. धवनने आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध 90 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 96 धावा केल्या. 

17 Jan, 21:02 (IST)

विराट कोहली आणि शिखर धवन यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली बॅटिंग कायम ठेवली आहे. दोंघांमध्ये अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली असून भारताचा स्कोर 150 धावांच्या पार पोहचला आहे. धवन त्याच्या शतकाच्या जवळ आहे, तर विराटही अर्धशतक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. 28 ओव्हरनंतर धवन 90 आणि विराट 32 धावांवर खेळत आहे. 

Read more


भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) क्रिकेट संघातील तीन सामन्यांच्या मालिकेचा दुसरा वनडे सामना आज राजकोटच्या (Rajkot) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने मुंबई वनडे सामन्यात 10 विकेटने विजय मिळवला आणि 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात केलेली चूक सुधारून भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीस येऊ शकतो. रोहित शर्मा आणि शिखर धवन डावाची सुरुवात करून केएल राहुल (KL Rahul) चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. जखमी विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत या सामन्यात खेळणार नाही. पहिल्या वनडे सामन्यात वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याचा बाउन्सर पंतच्या हेल्मेटला लागल्या ज्यानंतर त्याला कनकशनमध्ये बाहेर करण्यात आले आहे. आणि ती बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसनासाठी जाईल. त्याच्या जागी मनीष पांडे किंवा केदार जाधव यांना दुसर्‍या वनडेत संधी मिळू शकेल, तर राहुल विकेटकीपिंग करू शकेल. या सामन्यात शार्दुल ठाकूर याच्या जागी नवदीप सैनी खेळू शकतो. पहिल्या वनडे सामन्यात एकही विकेट न घेता शार्दुलने 5 षटकांत 43 धावा लुटवल्या होत्या. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

आजचा सामना जिंकणे टीम इंडियासाठी महत्वाचा आहे. मुंबईतील सामना जिंकल्यावर ऑस्ट्रेलियाने मालिकेत आघाडी घेतली आहे आणि जर आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने जिंकला तर भारत मालिका गमावून बसेल. आजच्या सामन्यासाठी भारताच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.  मात्र, ऑस्ट्रेलियाला बदल करण्याची गरज नाही आहे. डेविड वॉर्नर, कर्णधार आरोन फिंच, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, पॅट कमिन्स मिशेल स्टार्क यांची उपस्थिती ऑस्ट्रेलियाला मजबूत संघ बनवते.

असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया वनडे संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (विकेटकीपर), केदार जाधव, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, नवदीप सैनी, आणि युजवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया: आरोन फिंच (कॅप्टन), डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), डार्सी शॉर्ट, अ‍ॅश्टन टर्नर, जोश हेजलवुड, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, केन रिचर्डसन, अ‍ॅडम झांपा, अ‍ॅस्टन अगार, पीटर हैंडस्कोम्ब.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now