AUS 258/0 in 37.4 Overs (Target: 256) | IND vs AUS 1st ODI Live Score Updates: मुंबईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्द भारताचा लाजीरवाणा पराभव, 10 विकेटने उडवला विराट सेनेचा धुव्वा
श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया वेगळ्या स्वरूपात आणि मजबूत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय मालिकेत वैयक्तिक स्पर्धाही दिसतील ज्यात रोहित शर्मा विरुद्ध डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली विरुद्ध स्टीव्ह स्मिथ यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळेल.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील पहिल्या वनडे सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. डेविड वॉर्नर आणि आरोन फिंच यांच्या द्विशतकी भागीदारीच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने 10 विकेटने विराट सेनेचा धुव्वा उडवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. वॉर्नर आणि फिंच अनुक्रमे 128, 110 धावांवर नाबाद परतले.
डेव्हिड वॉर्नरने 18 वे वनडे शतक ठोकले. वॉर्नरने 88 चेंडूत शतक ठोकले. भारताने दिलेल्या 256 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी वर्चस्व कायम ठेवले. दोंघांनी द्विशतकी भागीदारी केली. फिंच 91 धावा करून खेळत आहे. ऑस्ट्रेलियाला आता जिंकण्यासाठी 108 चेंडूत 41 धावांची आवश्यकता आहे.
ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी डेविड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली दोघांनी एकही विकेट न गमावता 150 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली असून त्यांना विजयासाठी ९० धावांची गरज आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 255 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच आणि डेविड वॉर्नर यांच्या 150 धावांची भागीदारी पूर्ण झाली आहे. भारताने दिलेल्या 256 धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने एकीही विकेटन गमावता 23 ओव्हर मध्ये 156 धावा केल्या आहेत. दोघेही आता त्यांच्या शतकाच्या जवळ पोहचले आहे. फिंच 66 आणि वॉर्नर 76 धावा करून खेळत आहे. आणि भारत सर्वात मोठ्या पराभवाकडे जात आहे. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आता फक्त 100 धावांची गरज आहे.
भारतासाठी 20 वी ओव्हर फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजाने टाकली. जडेजाच्या या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दोन एकेरी, एक चौकार आणि एका चौकाराच्या मदतीने एकूण सात धावा केल्या. 20 ओव्हरनंतर संघाची धावसंख्या 140/0 आहे. आरोन फिंच 61 आणि डेव्हिड वॉर्नर 66 धावा करून खेळत आहे.
भारताने दिलेल्या 256 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करत ऑस्ट्रेलियाचे सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आणि कर्णधार आरोन फिंच यांनी अर्धशतक पूर्ण केले. वॉर्नरने 40 चेंडूत 21 वे अर्धशतक, तर फिंचने 52 चेंडूंचा सामना करत अर्धशतक पूर्ण केले. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारीही पूर्ण झाली आहे.
भारताने दिलेल्या 256 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने 10 ओव्हर संपल्यानंतर कोणतीही विकेट न गमावता 84 धावा केल्या आहेत. संघाकडून कर्णधार आरोन फिंच 41 आणि डेव्हिड वॉर्नर 37 धावा करून खेळत आहे. खेळत आहे.
भारताकडून जसप्रीत बुमराहने सातवी ओव्हर टाकली. बुमराहच्या दुसर्या चेंडूवर वॉर्नरने चौकार लगावला आणि वनडे कारकिर्दीतील 5000 धावा पूर्ण केल्या. 7 ओव्हरनंतर ऑस्ट्रेलियाचा स्कोर 46/0.
टीम इंडियाने दिलेल्या २५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत कर्णधार आरोन फिंच आणि डेविड वॉर्नर यांनी ऑस्ट्रेलियाला वेगवान सुरुवात करून दिली. फिंच 25, तर वॉर्नर 5 धावांवर खेळत आहे. भारतीय गोलंदाज विकेटसाठी प्रयत्नशील आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजी करताना रिषभ पंतच्या डोक्यावर चेंडू लागला. ज्यामुळे त्याला चक्कर आली. त्यामुळे, आता त्याच्या जागी केएल राहुल विकेटकिपिंग करताना दिसत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला आमंत्रित केले. अश्या परिस्थितीत भारताने निर्धारित 29,1 ओव्हरमध्ये ऑल आऊट होत 255 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर 256 धावांचे लक्ष्य ठेवले. कांगारू संघाकडून मिशेल स्टार्क याने 3, पॅट कमिन्स आणि केन रिचर्डसन यांनी 2 गडी बाद केले, तर अॅडम झांपा, एश्टन एगर, यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
जडेजा नंतर पंतदेखील बाद झाला. पॅट कमिन्सने बाऊन्सर फेकला जो पंतच्या बॅटच्या कप[त्याला लागून त्याच्या हेल्मेटला लागला आणि फील्डरने झेल टिपला. पंत 28 धावांवर बाद.
भारताला सहावा धक्का लागला. भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा 32 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकारासह 25 डावांची खेळी केल्यानंतर पॅव्हिलियनमध्ये परतला. रिचर्डसनने जडेजाला विकेटकिपर कॅरीकडे झेलबाद केले.
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 200 धावा पूर्ण झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्चस्व कायम ठेवत भारतीय फलंदाजांना मुश्किलीत टाकले. रवींद्र जडेजा 25, रिषभ पंत 27 धावांवर खेळत आहे. दोघे फलंदाज संघाला मोठा करून देण्यासचौकार आणि षटकार मारत आहे.
भारतीय संघाने 35 षटकांनंतर 5 गडी गमावून 169 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत 9 आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा 2 धावा करून खेळत आहे. शिखर धवन 74, रोहित शर्मा 10, लोकेश राहुल 47, विराट कोहली 16 आणि श्रेयस अय्यर 4 धावांवर आऊट होऊन माघारी परतले आहेत.
भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर 9 चेंडूत 4 धावा करून मिशेल स्टार्कचा बळी ठरला. यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीने अय्यरचा झेल पकडत भारताला पाचवा धक्का दिला.
केएल राहुल आणि शिखर धवननंतर भारताला मोठा धक्का बसला. ऍडम झाम्पा याने भारतीय कर्णधार विराट कोहलीला कॅच आऊट केले. कोहली 14 चेंडूत 16 धावा करून माघारी परतला. झाम्पाने कोहलीला बाद करत ऑस्ट्रेलियाला चौथे यश मिळवून दिले.
पॅट कमिन्सने भारताला तिसरा धक्का दिला. कमिन्सने शिखर धवनला ऍश्टन अगारकडे कॅच आऊट केले आणि भारतीय सलामी फलंदाजाला शतक पूर्ण करू दिले नाही. धवनने आज 91 चेंडूचा सामना करत 9 चौकार आणि 1 षटकार मारत 74 धावांची खेळी केली.
शिखर धवन आणि केएल राहुल यांच्यातील भागीदारी चांगली होत असताना ऍश्टन अगारने भारताला दुसरा धक्का दिला. अगारने राहुलला 47 धावांवर स्टिव्ह स्मिथकडे कॅच आऊट केले. भारताने 134 धावांवर दुसरी विकेट गमावली. राहुलने धवनसोबत शतकी भागीदारी केली आणि भारताला मजबूत स्थितीत पोचवले.
मंगळवार 14 जानेवारी रोजी ऑस्ट्रेलिया (Australia) संघाची मुंबई दौर्यावरुन भारत (India) दौर्याची सुरूवात होईल. तीन वनडे सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. श्रीलंकाविरुद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया वेगळ्या स्वरूपात आणि मजबूत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध मैदानात उतरेल. तीन वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघासाठी (Indian Team) सलामीची गाठ अद्याप गुंतागुंतीची आहे. मात्र, सामन्याच्या एक दिवसाआधी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने म्हटले कि रोहित शर्मा, शिखर धावा आणि केएल राहुल तिघे प्लेयिंग इलेव्हनचा भाग होऊ शकतात आणि तो स्वतः फलंदाजीसाठी खालच्या स्थानावर येऊ शकतो. रोहितचं सलामीला येणं निश्चित आहे, पण दुसरीकडे इन-फॉर्म राहुल आणि अनुभवी धवन यांच्यातदुसर्या टोकासाठी चुरशीची स्पर्धा आहे. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय मालिकेत वैयक्तिक स्पर्धाही दिसतील ज्यात रोहित शर्मा विरुद्ध डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली विरुद्ध स्टीव्ह स्मिथ यांच्यात रोमांचक लढत पाहायला मिळेल. अॅलेक्स कॅरी याची आक्रमक फलंदाजी आणि शानदार विकेटकीपिंगला भारताच्या रिषभ पंत याच्याकडून आव्हान मिळेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांच्या उपस्थितीमुळे भारताचा वेगवान गोलंदाजीचा आक्रमण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची कसोटी घेण्यासाठी सज्ज असेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडे आयपीएलचे सर्वात महागडे परदेशी खेळाडू पॅट कमिन्स, केन रिचर्डसन आणि अनुभवी मिशेल स्टार्क सारखे वेगवान गोलंदाज आहेत जे कोहली आणि संघाला त्रास देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटविणारा ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नूस लाबूशेन आपल्या सर्वोत्तम फॉर्मची पुनरावृत्ती वनडेमध्ये करू इच्छित आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)