IND vs WI 2nd ODI 2019 Match Live Streaming: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर

चेन्नईमध्ये झालेल्या 3 सामन्यांच्या पहिल्या वनडे सामन्यात आठ गडी राखून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध स्कोअर बरोबर करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणममध्ये खेळला जाईल.

File picture of India vs Windies. (Photo Credits: Getty Images)

चेन्नईमध्ये झालेल्या 3 सामन्यांच्या पहिल्या वनडे सामन्यात आठ गडी राखून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ (Indian Team) बुधवारी वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध स्कोअर बरोबर करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. दोन्ही संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणममध्ये खेळला जाईल. टीम इंडिया सध्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. जर टीम इंडियाला मालिकेतील आव्हान कायम ठेवायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत त्यांना विशाखापट्टणममध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. पहिल्या मॅचमध्ये भारतीय संघाने तिन्ही विभागात निराशाजनक कामगिरी केली. पण, चांगली बाब म्हणजे, मधल्या फळीतील युवा फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) फॉर्ममध्ये आले आहेत. चेन्नई मॅचमध्ये आघाडीचे तिन्ही फलंदाज माघारी परतल्यावर अय्यर आणि पंतने शतकी भागीदारी करत संघाला मुश्किल परिस्थितीतून बाहेर काढले. केदार जाधव यानेही अखेरच्या काही ओव्हरमध्ये दमदार बॅटिंग केली आणि आव्हानातम्क धावा करण्यासाठी 40 धावांचे योगदान दिले. पण, भारताची गोलंदाजी आणि फिल्डिंगने मात्र निराश केले. दुसरा सामना जिंकण्यासाठी सर्व विभागात भारताला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. (Look Who's Here! वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडेआधी जसप्रीत बुमराह, पृथ्वी शॉ यांचे टीम इंडियामध्ये पुनरागमन; BCCI च्या फोटोवर यूजर्सने दिल्या मजेदार प्रतिक्रिया)

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला वनडे सामना रविवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजेपासून खेळला जाईल, तर दुपारी 1.00 वाजता टॉस होईल. हा सामना भारतीय क्रिकेट चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकता. या मॅचची लाईव्ह स्ट्रीमिंग आपण हॉटस्टारवर पाहू शकता.

दुसरीकडे, किरोन पोलार्ड याचा नेतृत्वातील विंडीज संघ विशाखापट्टणममध्ये विजय निश्चित करत मालिका खिशात खळण्याच्या प्रयत्नात असेल. शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) हा विंडीजचा सर्वात धोकादायक फलंदाज मानला जातो. आणि पहिल्या मॅचमध्ये त्याने साजेशी कामगिरी केली. टीम इंडियाविरुद्ध मॅचमध्ये 139 धावांची खेळी करून हेलमेयरने विजय निश्चित केला. त्याला शाई होप याने चांगली साठी दिली. मात्र, विंडीजला त्यांच्या गोलंदाजीत सुधार करण्याची गरज आहे.

असे आहे भारत आणि वेस्ट इंडिज संघ:

भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, शिवम दुबे, केदार जाधव, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिज: सुनील अंब्रिस,शाई होप, खारी पियरे, रोस्टन चेझ, अलझरी जोसेफ, कीरोन पोलार्ड (कॅप्टन), शेल्डन कोटरेल, ब्रँडन किंग, निकोलस पूरन, शिमरोन हेटमायर, एव्हिन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, कीमो पॉल आणि हेडन वॉल्श जूनियर.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now