Live Cricket Streaming of India Women vs Australia Women ICC Women’s T20 World Cup 2020 Final: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज रंगणार आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 मधील अंतिम लढत; Live Score पाहा Star Sports आणि Hotstar वर
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 (ICC Women’s T20 World Cup 2020) मधील अंतिम लढत होणार असून भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Women Vs Australia Women Final) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (Melbourne Cricket Ground) येथे एकमेकांशी भिडणार आहेत.
Live Cricket Streaming of India Women vs Australia Women ICC Women’s T20 World Cup 2020 Final Match on Hotstar and Star Sports: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 (ICC Women’s T20 World Cup 2020) मधील अंतिम लढत होणार असून भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Women Vs Australia Women Final) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड (Melbourne Cricket Ground) येथे एकमेकांशी भिडणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना आज दुपारी 12. 30 वा. सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघाने चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 मधील अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. भारताची खेळाडू हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 'अ' गटातील चारही सामन्यात विजय मिळवून 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले होते. तसेच भारतीय महिला संघाने विश्वचषकातील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विश्वचषकाचा किताब जिंकावे, अशी सर्व भारतीयांची इच्छा आहे. या स्पर्धेतील साखळी सामन्यात भारतीय संघाने ऑस्टेलियाच्या संघाचा पराभव केला होता.
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 मध्ये एकही सामना न गमवता थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणारा भारत एकमेव संघ आहे. भारताची सलामीवीर शेफाली वर्मा हिने संपूर्ण स्पर्धेत तडाखेबाज फलंदाजी करत चाहत्यांचे मन जिंकली आहेत. शेफालीने मागील 4 सामन्यात 161 धावा ठोकल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत 16 वर्षीय शेफाली तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत शेफालीला दीप्ती शर्मा आणि रोड्रिगेजकडून चांगला प्रतिसात मिळाला आहे. तसेच गोलंदाजीत पूनम यादव चांगले प्रदर्शन करत असल्याचे दिसत आहे. विश्वचषकात पूनमने 9 विकेट पटकावले आहेत. हे देखील वाचा- INDW vs ENGW, Women's T20 World Cup Semi Final: भारतीय महिला क्रिकेट संघाचा फायनलमध्ये प्रवेश; आसीसीच्या 'या' नियमामुळे इंग्लंड पराभूत
आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना स्टार स्पोर्ट्स 1 आणि स्टार स्पोर्ट्स 2 वर पाहू शकतात. जे लोक ऑफिस किंवा अन्य कामासाठी घराबाहेर पडले आहे, त्यांनाही हॉटस्टार वर संपूर्ण सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येऊ शकते. ऑस्ट्रेलिया येथे होत असलेल्या विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला असून आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2020 चा किताब कोण जिंकणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.