भारत आणि यजमान न्यूझीलंड संघातील क्राइस्टचर्च स्टेडियमवर खेळल्या जाणार्या दुसर्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी किवी टीमने 7 विकेटने भारताचा परभाव केला आणि मालिका 2-0 ने जिंकली. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून टॉम लाथम आणि टॉम ब्लंडेलने अर्धशतकी कामगिरी केली. भारताने दिलेल्या 132 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 3 विकेट गमावल्या. जसप्रीत बुमराहने 2 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला. न्यूझीलंड दौऱ्यावरील भारताचा हा सलग दुसरा क्लीन स्वीप ठरला. यापूर्वी वनडे मालिकेत न्यूझीलंडने भारताविरुद्ध 3-0 असा विजय मिळवला होता.
IND vs NZ 2nd Test Day 3 Highlights: न्यूझीलंडने 7 विकेटने जिंकली दुसरी कसोटी, भारताचा सलग दुसऱ्यांदा केला क्लीन स्वीप
हेग्ले ओव्हलमध्ये भारत-न्यूझीलंड दरम्यान सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघावर पराभवाची टंकती तलवार आहे. भारताने न्यूझीलंडला रविवारी येथे झालेल्या दुसर्या क्रिकेट कसोटीच्या दुसर्या दिवशी पहिल्या डावात 235 धावांवर गुंडाळले, पण भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात पुन्हा एकदा निराश केले.
हेग्ले ओव्हलमध्ये भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) दरम्यान सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघावर पराभवाची टंकती तलवार आहे. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहच्या तुफानी गोलंदाजीमुळे भारताने न्यूझीलंडला रविवारी येथे झालेल्या दुसर्या क्रिकेट कसोटीच्या दुसर्या दिवशी पहिल्या डावात 235 धावांवर गुंडाळले, पण भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात पुन्हा एकदा निराश केले. पहिल्या डावाच्या आधारे सात धावांची आघाडी घेतलेल्या भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसर्या डावात 90 धावांत सहा विकेट गमावल्या. भारताची एकूण आघाडी 97 धावांची आहे. दिवसाचा खेळ संपल्यानंतर हनुमा विहारी (Hanuma Vihari) पाच धावा तर रिषभ पंत (Rishabh Pant) एक धाव करून खेळत होता. आता तिसऱ्या दिवशी भारताला आता पराभव टाळण्यासाठी मोठी आघाडी वाढवण्याची गरज आहे.
दुसर्या डावात ट्रेंट बोल्टने (Trent Boult) भारतीय फलंदाजांना सतत अडचणीत आणले. टिम साऊथी, नील वॅग्नर आणि कॉलिन डी ग्रैंडहोमने त्याला चांगली साथ दिली. दुसर्या दिवशी हेगले ओव्हलच्या गोलंदाजांनी 262 धावांवर 16 गडी बाद केले. न्यूझीलंडने सर्व 10 गमावले तर भारताने 6 गडी गमावले. यापूर्वी शमी, बुमराह आणि रवींद्र जडेजाच्या धारदार गोलंदाजीसमोर न्यूझीलंड संघ पहिल्या डावात 235 धावांवर ऑलआऊट झाला. संघासाठी सलामीवीर टॉम लाथमने सर्वाधिक 52 धावा केल्या तर काईल जैमीसनने 49 धावा केल्या. भारताने न्यूझीलंडची स्थिती 177 धावांवर आठ विकेट अशी केली होती, मात्र अंतर वॅग्नर आणि जैमीसनने नवव्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी केली आणि भारताच्या मोठी आघाडी घेण्याच्या हेतूवर पाणी फिरवले. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)