India VS Srilanka T20 Macth: जसप्रीत बुमराह याचे धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, मलिंगाने काहीही शिकवले नाही!
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) त्यांच्या यॉर्करमुळे ओळखला जातो. बुमराह यांच्या गोलंदाजीसमोर जगातील मोठ्या फलंदाजाने गुघडे टेकले आहेत. महत्वाचे म्हणजे, श्रीलंकाचे मुख्य गोलंदाज लथिस मलिंगा (Lasith Malinga) आणि जयप्रीत बुमराह हे दोघेही खेळाडू गेल्या अनेक वर्षापासून मुंबई इंडियन्स संघात खेळत आहेत.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) त्यांच्या यॉर्करमुळे ओळखला जातो. बुमराह यांच्या गोलंदाजीसमोर जगातील मोठ्या फलंदाजाने गुघडे टेकले आहेत. महत्वाचे म्हणजे, श्रीलंकाचे मुख्य गोलंदाज लथिस मलिंगा (Lasith Malinga) आणि जयप्रीत बुमराह हे दोघेही खेळाडू गेल्या अनेक वर्षापासून मुंबई इंडियन्स संघात खेळत आहेत. यामुळे जसप्रीत बुमराह हा लथिस मलिंगा याच्या मार्गदर्शनाखाली यॉर्कर शिकल्याची चर्चा सविस्तर होत असते. यावर जसप्रीत बुमराह यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवत उपस्थित प्रश्न चिन्हांना पूर्णविराण लावला आहे. मी माझी मेहनत आणि अनुभवाची जोरावर यॉर्कर शिकलो आहे. लथिस मलिंगा यांनी मलाच काहीच शिकवले नाही, असे जसप्रीत बुमराह म्हणाले आहेत.
श्रीलंका संघ सध्या भारतीय दौऱ्यावर असून भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 टी-20 सामने खेळले जाणार आहे. लथिस मलिंगा हे श्रीलंका संघाचा मुख्य गोलंदाज आहे. जसप्रीत बुहराह आणि लथिस मलिंगा मुंबई इंडियन्सकडून एका संघात खेळत आहेत. मात्र, भारतात आणि श्रीलंका यांच्यात 3 टी-20 सामना रंगणार असून दोघेही खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. दरम्यान, लथिस मलिंगा यांनी जसप्रीत बुमराह याला यॉर्कर शिकवले असल्याची चर्चा सर्वत्र आहे. यावर जसप्रीत बुमराह म्हणाला आहे की, मी माझ्या मेहनती आणि अनुभवाच्या जोरावर यार्कर शिकलो आहे. तसेच लथिस मलिंगा यांनी मला काहीच शिकवले नसल्याचा खुलासा त्याने केला आहे. मैदानात असताना वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना कसा करायचा हे मी लथिस मलिंगा यांच्याकडून शिकलो आहे, असेही जसप्रीत बुमराह म्हणाले आहेत. हे देखील वाचा-Maharashtra Kesari 2019-20 Day 1 Live Streaming: 'महारासष्ट्र केसरी कुस्ती' स्पर्धेला आजपासून सुरूवात; इथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग़
दरम्यान, जसप्रीत बुमराह म्हणाला की, गली क्रिकेट खेळत असताना आमच्याकडे रबरचा बॉल असायचा जो खूप कठीण होता. हा चेंडू खूप स्विंग करायचा. आम्ही खेळपट्टीवर खेळलो नाही म्हणून बॉल स्विंग होत नसे. तसेच विकेटच्या मागे झेल होण्याची शक्यता नव्हती. अशा परिस्थितीत मी बॉल फुल लेन्थ वर टाकण्याचा प्रयत्न करीत असे. तसेच येथे विकेट आवश्यकता असल्यास टाकावा लागत असे. माझा असा विश्वास आहे की, या अनुभवाने मला खूप काही शिकवले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)