Lala Amarnath 120th Birth Anniversary Special: स्वतंत्र भारताचे पहिले टेस्ट कर्णधार व शतकवीर यांच्याबद्दल जाणून घ्या काही मजेदार गोष्टी
11 सप्टेंबर, 111 रोजी पंजाबच्या कपूरथला राज्यात नैनीक अमरनाथ भारद्वाज या नावाने जन्मलेले, अमरनाथ यांना त्यांना लाला अमरनाथ म्हणून ओळखले जाते. देशाचे पहिले कसोटी कर्णधाराची 120 वी जयंतीनिमित्त आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही मजेदार गोष्टी.
Lala Amarnath 120th Birth Anniversary Special: स्वतंत्र भारताचे पहिले कसोटी कर्णधार लाला अमरनाथ (Lala Amarnath) यांचा जन्म आजच्या दिवशी 1911 मध्ये झाला. 11 सप्टेंबर, 111 रोजी पंजाबच्या कपूरथला राज्यात नैनीक अमरनाथ भारद्वाज (Nainik Amarnath Bhardwaj) या नावाने जन्मलेले, अमरनाथ यांना त्यांना लाला अमरनाथ म्हणून ओळखले जाते. ते भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket) एक रंगतदार व्यक्ति आणि खेळाचे एक महान दिग्गज होते. 5 ऑगस्ट 2000 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालेल्या लाला अमरनाथ यांची आज 120 वी जयंती आहे. भारताचे एका क्रिकेट महान क्रिकेटपटू आणि देशाचे पहिले कसोटी कर्णधाराची 120 वी जयंतीनिमित्त आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही मजेदार गोष्टी. भारताने क्रिकेटमध्ये कसोटी पदार्पणाला 88 वर्षे पूर्ण केली आहेत आणि जवळपास 9 दशकांच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाने संपूर्ण जगात खेळत वर्चस्व गाजवणारे अनेक क्रिकेटपटूंना दिले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं झळकावण्याचा भारतीय क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरने अनोखा विक्रम नोंदवला असला तरी लाला अमरनाथ यांनी कसोटीमधील स्वतंत्र भारताचे पहिले शतक ठोकले होते. (On This Day in 1994: आजच्या दिवशी सचिन तेंडुलकरने ठोकले करिअरमधील पहिले वनडे शतक, 79 व्या डावात 5 वर्षाची प्रतीक्षा आणली संपुष्टात)
अमरनाथचा जन्म पंजाबच्या कपूरथला (Kapurthala) राज्यात झाला आणि त्याचे लाहोर लाहोरमध्ये अजमत राणा आणि शफकत राणा कुटुंबात वाढ झाली. 15 डिसेंबर 1933 रोजी त्यांनी इंग्लंडविरुद्ध मुंबई येथे सामन्यात पदार्पण केले आणि पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीशिवाय लाला अमरनाथ एक सुलभ गोलंदाज आणि विकेटकीपिंग देखील करायचे. त्यांनी 24 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले.
1. लाला अमरनाथ यांचा जन्म 11 सप्टेंबर 1911 रोजी पंजाबच्या कपूरथला राज्यात नैतिक अमरनाथ भारद्वाज या नात्याने झाला होता.
2. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात कसोटी शतक ठोकणारे टी पहिला क्रिकेट खेळाडू होते
3. लाला अमरनाथ स्वतंत्र भारताचा पहिला कसोटी कर्णधार होते आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या कसोटी दौर्यावर देशाचे नेतृत्व केले. या दौऱ्यावर 5 पैकी चार कसोटी सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले होते. तर 1 सामना अनिर्णित राहिला होता.
4. कसोटी शतक झळकावणारे ते पहिले भारतीय फलंदाजही होता आणि 1933 मध्ये कसोटी पदार्पणाच्या दुसर्या डावात इंग्लंडविरुद्ध त्यांनी शतकी डाव खेळला. त्यांनी इंग्लंडविरुद्ध वयाच्या 22 व्या वर्षी पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 118 धावांची शतकी खेळी केली होती.
5. अमरनाथ यांनी भारताच्या पहिल्या कसोटी मालिकेतील विजयात मार्गदर्शन केले. 1952 मध्ये पाकिस्तानविरुद्ध मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला
6. टेस्टमध्ये सर डोनाल्ड ब्रॅडमन यांना हिट-विकेट आऊट करणारे लाला अमरनाथ एकमेव गोलंदाज आहेत
7. 1991 मध्ये क्रिकेटमधील त्यांच्या सेवाबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले
8. लाला अमरनाथ यांचे दोन मुलगे मोहिंदर अमरनाथ आणि सुरिंदर अमरनाथ यांनी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले. त्याचा तिसरा मुलगा राजिंदर अमरनाथ यांनी रणजी ट्रॉफी खेळली तर नातू दिग्विजय घरगुती क्रिकेट खेळतो.
9. अमरनाथ यांनी भारताबरोबरच गुजरात, हिंदू, महाराजा ऑफ पटियाला इलेव्हन, रेल्वे, दक्षिण पंजाब आणि उत्तर प्रदेश संघाकडूनही क्रिकेट खेळले आहे.
अमरनाथ यांनी त्यांच्या कारकिर्दीत 24 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्यांनी 24.38 च्या सरासरीने 878 धावा केल्या. यात त्यांच्या एका शतकाचा आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी 24 कसोटी सामने खेळताना 45 विकेट्सही घेतल्या.