KXIP vs DC, IPL 2020 Live Streaming: किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर

किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स दरम्यान आयपीएलचा 38वा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

KXIP vs DC, IPL 2020 Live Streaming: किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) दरम्यान आयपीएलचा (IPL) 38वा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) खेळला जाईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने आजवर खेळलेल्या 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. दिल्ली पॉइंट्स टेबलवर 14 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर पंजाबचे 9 सामन्यांपैकी 6 गुण असून ते सातव्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यात किंग्स इलेव्हन आपला सलग तिसरा विजय मिळवू पाहत असेल, तर पंजाब आजचा सामना जिंकून प्ले-ऑफ फेरीत आपले स्थान निश्चित करण्याच्या निर्धारित असतील. किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्समधील आजचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. 7 वाजता टॉस होणार असून सामना 7:30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: CSK विरुद्ध विजयानंतर RR संघाचा आयपीएलच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप)

गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध रोमांचक सामन्यात मिळालेल्या विजयामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबचे मनोबल वाढले असेल पण त्यानंतर सातत्याने कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या या संघाचा मार्ग सुकर होणार नाही. हंगामाच्या सुरूवातीस जिंकलेले दोन सामने गमावल्यानंतर किंग्ज इलेव्हनने मागील दोन सामन्यात विजय मिळवला आहे. दुसरीकडे, दिल्लीच्या टीम टूर्नामेंटमध्ये आजवरची सर्वात यशस्वी टीम आहे आणि शनिवारी रात्री चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजयानंतर त्यांचाही आत्मविश्वास वाढला असेल.

पाहा किंग्स इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स संघ

किंग्स इलेव्हन पंजाब: केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, क्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, करुण नायर, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, शेल्डन कॉटरेल, दीपक हूडा, ख्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, मनदीप सिंह, कृष्णप्पा गौथम, जेम्स नीशम, सरफराज खान, हार्दस विल्जोईन, जगदीश सुचित, ईशान पोरेल, मुजीब उर रहमान, तजिंदर सिंह, दर्शन नलकंडे, प्रभसिमरन सिंह, हरप्रीत ब्रार.

दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर (कॅप्टन), अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोईनिस, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, तुषार देशपांडे, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे, हर्षल पटेल, मोहित शर्मा, अवेश खान, शिमरॉन हेटमायर, प्रवीण दुबे, रिषभ पंत, संदीप लामिछाने, कीमो पॉल, डॅनियल सॅम्स, ललित यादव.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement