KXIP vs CSK , IPL 2019 Live Cricket Streaming and Score: किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
इंडियन प्रिमियर लीग च्या 12 व्या सीजनमधील 55 वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आयएस बिंद्रा स्टेडियमवर रंगणार आहे.
इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier League) च्या 12 व्या सीजनमधील 55 वा सामना किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात आयएस बिंद्रा स्टेडियमवर (The Punjab Cricket Association Inderjit Singh Bindra Stadium) रंगणार आहे. धोनीचा चेन्नई संघ हा प्ले ऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरला आहे. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांनीही प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. या तीन संघांशिवाय चौथ्या स्थानासाठी कोलकता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैद्राबाद यांच्यात चुरस आहे.
कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?
पंजाब विरुद्ध चेन्नई हा सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पंजाब विरुद्ध चेन्नई नाणेफेक:
पंजाब विरुद्ध चेन्नई सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
असे असतील दोन्ही संघ:
किंग्स इलेव्हन पंजाब: रविचंद्रन अश्विन (कर्णधार), लोकेश राहुल, क्रिस गेल, एंड्रयू टाई, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रहमान, करुण नायर, डेविड मिलर, मोइसिस हेनरिक्स, निकोलस पूरन, वरुण चक्रवर्ती, सॅम कुरेन, मोहम्मद शमी, सरफराज खान, हरडस विजोएन, अर्शदीप सिंह, दर्शन नालकंडे, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयाची, हरप्रीत बराड आणि मुरुगन अश्विन.
चेन्नई सुपर किंग्स: अंबाती रायडू, शेन वाटसन, सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वायन ब्रावो, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, हरभजन सिंग, इमरान ताहिर, मुरली विजय, ध्रुव शौरे, फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मिशेल सॅटनर, डेविड विली, सॅम बिलिंग्स, समीर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, केएम आसिफ, मोहित शर्मा.