Kuldeep Yadav (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 1st: टीम इंडिया आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. त्याचवेळी बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर आटोपला. टीम इंडियाने फॉलोऑन केला नाही. बांगलादेशकडून मुशफिकर रहीमने सर्वाधिक 28 धावा केल्या. टीम इंडियाकडून कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) सर्वाधिक 5 बळी घेतले.

कुलदीप यादवने बांगलादेशविरुद्धच्या चितगाव कसोटीच्या पहिल्या डावात 5 विकेट घेतल्या होत्या. या धमाकेदार कामगिरीने कुलदीप यादवने एक विशेष कामगिरी आपल्या नावावर केली आहे. कुलदीप यादवने 16 षटकात 40 धावा देत 6 मेडन ओव्हर्स घेतले. यासह कुलदीप यादवने तिसऱ्यांदा कसोटी सामन्याच्या एका डावात 5 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. (हे देखील वाचा: IND vs BAN Test Series 2022: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी रोहित शर्मा असु शकतो उपलब्ध, संघ व्यवस्थापनाला दिली माहिती)

कुलदीप यादवने बांगलादेशपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि भारतात हा पराक्रम करून दाखवला आहे. कुलदीपने कमी सामन्यांमध्ये स्वत:ला चांगले सिद्ध केले आहे. बांगलादेशच्या पहिल्या डावात कुलदीप यादवने मुशफिकुर रहमानला 28 धावांवर बाद केले. कुलदीपने बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनचीही विकेट घेतली. त्यांच्यासह कुलदीप यादवने तैजुल इस्लाम, नुरुल हसन आणि इबादत हुसेन यांना बाद केले. अशा प्रकारे कुलदीपने आपले 5 बळी पूर्ण केले.