AUS vs WI 2nd Test 2022 Live Streaming Online: भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज डे-नाईट कसोटी सामना कधी आणि कुठे पाहणार, घ्या जाणून
दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ यशस्वी पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
AUS vs WI 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज (AUS vs WES) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आज एडिलेड वर खेळवला जाार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळवला जाणार असुन डे-नाईट सामना असणार आहे. पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजला 164 धावांनी पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला निःसंशयपणे आत्मविश्वास वाटत असेल. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया आता 1-0 ने पुढे आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ यशस्वी पुनरागमन करून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. पॅट कमिन्सला दुखापतीतून सावरण्यात अपयश आले असून तो वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळणार नाही आहे. तसेच हा सामना तुम्ही भारताता कुठे पाहु शकतात या बद्दल जाणून घ्या...
भारतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा कसोटी सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना गुरुवार, 8 डिसेंबर रोजी म्हणजे आज आहे. सामना अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे.
भारतात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोणत्या वेळी पाहू शकता?
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील दुसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता पाहता येईल.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण तुम्ही पाहू शकता.
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकता?
या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही सोनी लाइव्हवर पाहु शकतात.