IND vs AUS 1st T20: स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना केएल राहुलचे चोख प्रत्युत्तर, अर्धशतक ठोकून केली ही मोठी कामगिरी

राहुल आणि पंड्याने झंझावाती अर्धशतके ठोकली. यासोबतच राहुलने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावाही पूर्ण केल्या आहेत.

KL Rahul (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार ऑरोन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 गडी गमावून 208 धावांची मोठी मजल मारली. टीम इंडियाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात केएल राहुल, (KL Rahul) हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांचा मोलाचा वाटा होता. राहुल आणि पंड्याने झंझावाती अर्धशतके ठोकली. यासोबतच राहुलने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2000 धावाही पूर्ण केल्या आहेत. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यापूर्वी राहुलला त्याच्या स्कोअरिंग रेटबद्दल प्रश्न विचारण्यात आला आणि त्याच्या स्ट्राइक रेटवर जोरदार टीका झाली. मात्र, राहुलने आता बॅक टू बॅक फिफ्टी ठोकत त्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

राहुलने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने T20I मध्ये 40 पेक्षा जास्त च्या सरासरीने आणि 140 पेक्षा जास्त च्या स्ट्राईक रेटने 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात त्याने कारकिर्दीतील 18 वे अर्धशतक झळकावले. T20I क्रिकेटच्या 58 डावांमध्ये त्याने 20 डावांमध्ये 50 हून अधिक धावा केल्या आहेत. आपल्या खेळीदरम्यान राहुलने 35 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह 55 धावा केल्या. (हे देखील वाचा: IND vs AUS: केएल राहुलने अर्धशतक ठोकल्यानंतर बाद, पाहा त्याचा जबरदस्त षटकार)

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा

52 - बाबर आझम

56 - विराट कोहली

58 - केएल राहुल

62 - आरोन फिंच

66 - ब्रेंडन मॅक्युलम

शानदार खेळी केल्यानंतर राहुल म्हणाला, ‘‘चांगली खेळपट्टी दिसते. खेळपट्टीच्या उसळीची सवय व्हायला थोडा वेळ लागला. मी येथे आयपीएल खेळलो आहे आणि मला शॉट्स माहित होते. मी माझा अनुभव वापरला. मी नेहमी मैदानाच्या दोन्ही बाजूंना मारण्याचे काम करतो आणि चांगल्या स्थितीत येतो. सुदैवाने चेंडू अशा भागात होता जिथे मी षटकार मारू शकतो.