KL Rahul Out or Not Out: केएल राहुलसोबत झाली चीटिंग? थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे पर्थ कसोटीत चर्चेला उधाण
तिसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. जैस्वाला खातेही उघडता आले नाही.
IND vs AUS 1st Test 2024: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 ची सुरुवात पर्थ कसोटीने झाली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी आले मात्र त्यांना विशेष काही करता आले नाही. तिसऱ्याच षटकात मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. जैस्वाला खातेही उघडता आले नाही. यानंतर देवदत्त पडिक्कलही शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीही काही विशेष करू शकला नाही आणि केवळ 5 धावा करून जोश हेझलवूडचा बळी ठरला. या वेळी केएल राहुलने (KL Rahul) एक टोक धरले आणि हळूहळू संघाच्या खात्यात धावांची भर घातली. हे देखील वाचा: IND vs AUS, Perth Test: विराट कोहली पुन्हा फ्लॉप, 7 वर्षात पहिल्यांदाच पाहावा लागला इतका लाजिरवाणा दिवस)
केएल राहुलसोबत झाली चीटिंग?
70 पेक्षा जास्त चेंडू खेळून केएल राहुलने जवळपास आपले पाऊल निश्चित केले होते जेव्हा 23 व्या षटकात काहीतरी झाले ज्यामुळे वादाला तोंड फुटले. वास्तविक, टीम इंडियाने 22 षटकात 3 विकेट गमावून 47 धावा केल्या होत्या. पंत 10 धावा केल्यानंतर आणि केएल राहुल 26 धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित होता. यानंतर 23व्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजीसाठी आला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर, स्टार्कने एक लांबीचा चेंडू टाकला जो केएलने बचाव केला. चेंडू बॅटच्या अगदी जवळ आला आणि विकेटकीपरच्या हातात गेला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरदार अपील केले पण ते मैदानावरील अंपायरकडून फेटाळण्यात आले.
थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे उडाली खळबळ
केएल राहुलची मोठी विकेट गमावल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने लगेच रिव्ह्यू घेतला. यानंतर, चेंडू बॅटजवळ येताच स्निकोमीटरमध्ये हालचाल झाल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर हे पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू उत्साहित झाले आणि त्यानंतर काही वेळाने टीव्ही अंपायरने मैदानावरील अंपायरकडून निर्णय मागे घेण्यास सांगितले. आणि त्याला आऊट देण्यात आले. या निर्णयामुळे केएल राहुल खूपच निराश दिसला कारण ज्यावेळी स्पाइक दिसत होता त्याच वेळी बॅटही पॅडला लागली होती. या संपूर्ण घटनेदरम्यान टीव्ही अंपायरकडे फक्त दोन अँगल उपलब्ध असल्याचे समोर आले. अशाप्रकारे बॉर्डर-गावस्कर स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी केएलच्या विकेटने खळबळ उडवून दिली. आता अनेक माजी भारतीय क्रिकेटपटूंनी केएलच्या विकेटवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
चाहत्यांकडून सोशल मीडियावर संताप व्यक्त
रिव्ह्यू दरम्यान ऑफ-साइड अँगल न दाखवल्यामुळे भारतीय चाहते इंटरनेट आणि सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. स्निकोमीटरवरील स्पाइक बॉल-बॅट कनेक्शनमुळे किंवा बॅट आणि पॅडच्या टक्करमधून आला आहे की नाही हे ऑफ-साइड अँगलवरून स्पष्ट होऊ शकते. खराब पंचांवर जोरदार टीका केली जात आहे की सर्व कोन न पाहता आणि कोणतेही निर्णायक पुरावे न देता निर्णय कसा देता येईल?