KKR vs RR, IPL 2020: कोलकाताच्या भेदक गोलंदाजीपुढे राजस्थान ढेर, नाईट रायडर्सचा 60 धावांनी रॉयल विजय

प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 131 धावाच करता आल्या आणि 60 धावांनी पराभव पत्करावा लागला. नाईट रायडर्सने रॉयल्सपुढे धावांचं तगडं आव्हान दिलं होतं मात्र राजस्थानचे दिग्गज फलंदाज कोलकाताच्या गोलंदाजांपुढे ढेर झाले.

कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

KKR vs RR, IPL 2020: कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 53व्या सामन्यात पहिले फलंदाजी करत 192 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 131 धावाच करता आल्या आणि 60 धावांनी पराभव पत्करावा लागला. नाईट रायडर्सने रॉयल्सपुढे धावांचं तगडं आव्हान दिलं होतं मात्र राजस्थानचे दिग्गज फलंदाज कोलकाताच्या गोलंदाजांपुढे ढेर झाले. राजस्थानकडून लक्ष्याचा पाठलाग करताना जोस बटलरने सर्वाधिक 35 धावा केल्या, राहुल तेवतियाने 31 आणि बेन स्टोक्सने 18 धावांचे योगदान दिले. राजस्थानचे अन्य फलंदाजी दुहेरी धावा करू शकले नाही परिणामी संघाचा पराभव झाला. दुसरीकडे, केकेआर गोलंदाजांनी सुरुवातीपासून आपले वर्चस्व कायम ठेवले. राजस्थानसाठी पॅट कमिन्सने (Pat Cummins) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम मावी (Shivam Mavi) यांना प्रत्येकी 2 व कमलेश नागरकोटीला 1 विकेट मिळाली. आजच्या सामन्यात विजय मिळवत कोलकाताने प्ले ऑफसाठी आपले आव्हान कायम ठेवले आहे तर राजस्थानची मोहीम इथेच संपुष्टात आली. (KKR vs RR, IPL 2020: नाईट रायडर्ससाठी धावला कर्णधार इयन मॉर्गन, कोलकाताचे रॉयल्सपुढे विजयासाठी 192 धावांचं तगडं आव्हान)

नाईट रायडर्सने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत राजस्थानने दमदार सुरुवात केली. बेन स्टोक्स आणि रॉबिन उथप्पाने पहिल्या पाच चेंडूत 19 धावा काढल्या, पण ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर कमिन्सने उथप्पाला 6 धावांवर कमलेश नागरकोटीकडे झेलबाद केले. त्यानंतर कमिन्सने राजस्थानला दुसरा झटका देत स्टोक्सला 18 धावांवर माघारी धाडलं. स्टिव्ह स्मिथला स्वस्तात बाद करून कमिन्सने तिसरे यश मिळवले. स्मिथला आजच्या सामन्यत 4 धावाच करता आल्या. संजू सॅमसन एक धाव करून मावीच्या चेंडूवर बाद झाला. रियान पराग देखील भोपळा न फोडता माघारी परतला. जोस बटलर आणि राहुल तेवतिया यांनी डाव हाताळण्याचा प्रयत्न केला, पण दोघे अपयशी ठरले. बटलर 35 आणि राहुल 31 धावा चक्रवर्तीच्या चेंडूवर बाद होऊन माघारी परतले. जोफ्रा आर्चरच्या रूपात रॉयल्सला आठवा धक्का बसला. आर्चरने 8 धावा केल्या.

दुसरीकडे, राजस्थानविरुद्ध सामन्यात नाईट रायडर्सचा कर्णधार इयन मॉर्गनने महत्वाची भूमिका बजावली. दिग्गज फलंदाजांनी निराश केल्यावर मॉर्गनने एकटी लढत दिली. मॉर्गनने नाबाद 68 धावा केल्या. याशिवाय, राहुल त्रिपाठीने 39 आणि शुभमन गिलने 36 धावा केल्या. दुखापतीनंतर संघात परतणाऱ्या आंद्रे रसेलने 25 धावा केल्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif