IPL 2024: 'किंग बोलणे बंद करा, मला लाज वाटते', विराट कोहलीने अचूक शब्दात व्यक्त केली 'मनाची गोष्ट'

स्टार क्रिकेटरने त्याच्या चाहत्यांना विनम्रपणे विनंती केली की, त्याचा उल्लेख करताना 'किंग' हा शब्द वापरणे थांबवा.

Virat Kohli (Photo Credit - X)

Virat Kohli: आयपीएल 2024 (IPL 2024) पूर्वी विराट कोहलीने (Virat Kohli त्याच्या चाहत्यांना 'किंग' म्हणून संबोधू नका अशी विनंती केली आहे. या नावाने हाक मारल्याबद्दल भारतीय फलंदाजाने आपले मत व्यक्त केले आणि म्हटले की यामुळे त्याला लाज वाटते. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित आरसीबीच्या नवीन आयपीएल जर्सीच्या भव्य अनबॉक्सिंग समारंभात तो बोलत होता. विराट कोहलीने सर्व चाहत्यांसमोर ही गोष्ट मांडली. स्टार क्रिकेटरने त्याच्या चाहत्यांना विनम्रपणे विनंती केली की, त्याचा उल्लेख करताना 'किंग' हा शब्द वापरणे थांबवा. (हे देखील वाचा: Virat Kohli's New Hairstyle: IPL पूर्वी, विराट कोहलीची नवी हेअरस्टाईल, स्टायलिस्ट Aalim Hakim ने आरसीबी स्टारचा नवीन लूक केला शेअर)

आतापासून मला फक्त विराट म्हणा...

कार्यक्रमादरम्यान विराट म्हणाला, “सर्वप्रथम तुम्ही मला त्या शब्दाने किंग (राजा) हाक मारणे बंद करा. कृपया मला विराट म्हणा. मी फक्त फाफ डु प्लेसिसला सांगत होतो की जेव्हा चाहते मला हा शब्द म्हणतात तेव्हा दरवर्षी मला लाज वाटते. त्यामुळे आतापासून मला फक्त विराट म्हणा, असा शब्द वापरू नका. हे माझ्यासाठी खूप लाजिरवाणे आहे.”

आरसीबी 22 मार्चपासून करणार मोहीमेला सुरुवात 

22 मार्च रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध टूर्नामेंटच्या पहिल्या सामन्यात RCB त्यांच्या IPL 2024 मोहिमेची सुरुवात करेल. 2008 मध्ये स्पर्धेच्या सुरुवातीपासून आरसीबीने कधीही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नाही. दुसरीकडे, सीएसकेच्या नावावर पाच जेतेपदे आहेत.