Video: टीम इंडियाचा फलंदाज केदार जाधव याने वाढदिवसादिनी रक्तदान करत जिंकली मनं, नागरिकांनाही केले पुढे येण्याचे आवाहन
जाधवने आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला, जो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जाधवने गुरुवारी वाढदिवसानिमित्त आपल्या गावी पुण्यात मदतीसाठी आवश्यक असलेल्या व्यक्तीला रक्तदान केले.
आज भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) खेळाडू केदार जाधव (Kedar Jadhav) याचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याला शुभेच्छा मिळणाऱ्यांची प्रक्रिया सुरूच आहे. यावेळी जाधवने आपल्या वाढदिवसानिमित्त काही वेगळेच केले आहे. जाधवने आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला, जो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जाधवने गुरुवारी वाढदिवसानिमित्त आपल्या गावी पुण्यात मदतीसाठी आवश्यक असलेल्या व्यक्तीला रक्तदान केले. केदार जाधव यांचा 26 मार्च 1985 रोजी जन्म झाला असून आज त्याचा 35 वा वाढदिवस आहे. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकामुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतर केदार आपल्या गावी परतला. सामाजिक बांधिलकीचे ध्यानात ठेवून गरजूंना रक्तदान केल्याबद्दल केदारचे सोशल मीडियावर यूजर्सकडून कुतुकही करण्यात आले. केदारने त्याचा रक्तदान करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. लॉकडाऊनमुळे एकीकडे लोकं घरातच बंद आहेत, त्या सर्वांमध्ये केदारने आपला वाढदिवस साजरा करण्याचा एक नवीन मार्ग शोधून काढला. (Coronavirus: रक्ताचा मोठा तुटवडा, रक्तदान करा! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे जनतेला कळकळीचे अवाहन)
व्हिडिओ शेअर करताना केदारने कॅप्शनमध्ये लिहिले की, "गरजू लोकांना रक्त देऊन मी आपले काम करत आहे. स्वत: ला सुरक्षित ठेवा आणि घरातच रहा." या व्हिडीओमध्ये केदार पडून रक्तदान करत असल्याचे दिसून येत आहे. त्याने हातात एक बॉल धरला आहे. तो कॅमेराच्या मागच्या एखाद्याशी मराठीतही बोलत आहे आणि हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे सांगत आहे. समाजावरसाठी ही आपली जबाबदारी आहे आणि मानवजातीसाठी हे माझे छोटे कार्य आहे. या व्हिडिओसह त्याने वी केअर, डोनेट ब्लड, फाइट कोरोना आणि इंडिया फाइट कोरोना (India Fight Corona) हॅशटॅग देखील दिले आहेत.
यापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले होते की ब्लड बँकमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे त्यामुळे राज्यातील नागरिकांनी रक्तदान करावं. कोरोनाच्या परिस्थितीत रक्तदान करु नये, असं काहीही नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.