आज होतेय कोट्यवधी रुपयांची उलाढाल, त्यावेळी इतक्या मानधनात खेळी होती विश्वचषक विजेता कपिल देवची टीम इंडिया
1983मध्ये जेव्हा भारतीय संघाने देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा विश्वचषक उंचावला होता, तेव्हा मिळालेली बक्षीस रक्कम ही आज कोणा लहान मुलाला हात खर्चासाठी देखील पालक देत नसतील.
यंदाच्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकचे फायनल इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात पार पडले. शेवटच्या चेंडूपर्यंत थरार रंगलेल्या या सामन्यात अखेरीस इंग्लंड संघ विजयी झाला आणि त्यांनी पहिल्यांदा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघावर आयसीसीकडून पैशांचा पाऊस पाडण्यात आला. इंग्लंड संघाला आयसीसीकडून 40 लाख डॉलर म्हणजेच 27 कोटी 46 लाख 50 हजार भारतीय रुपये मानधन म्हणून मिळाले. आज जगभरातील आघाडीच्या खेळाडूंना लाख आणि कोटींच्या घरात मानधन मिळते. पण 25-30 वर्षाआधी असे काही नव्हते. 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या खेळाडूंना दिवसाला फार कमी पैसे मिळायचे. 1983मध्ये जेव्हा भारतीय संघाने देव यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा विश्वचषक उंचावला होता, तेव्हा मिळालेली बक्षीस रक्कम ही आज कोणा लहान मुलाला हात खर्चासाठी देखील पालक देत नसतील. (युवराज सिंघचे वडील योगराज सिंघ यांनी केली पोलखोल, एम एस धोनी ने मुद्दाम विश्वचषक सेमीफायनल सामना गमावल्याचा केला आरोप)
सध्या सोशल मीडियावर एक फोटो वायरल होत आहे. करंद वैंगणकर व्यक्तीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये 1983मधील भारतीय संघाचे मानधन लिहिले आहे. 21 सप्टेंबर 1983च्या वनडे मालिकेतील हा फोटो आहे. बिशन सिंघ बेदी (Bishan Singh Bedi) हे त्यावेळी संघाचे मॅनेजर होते. या यादीनुसार सर्व खेळाडूंना 1500 रुपये मॅच फी मिळत होती. यात 200 रुपये प्रतिदीन असा भत्ता दिला जायचा. यानुसार खेळाडूंना एकूण 2100 रुपये दिले जात होते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. दुसरीकडे, घरगुती क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना 4 दिवसांच्या सामन्यासाठी प्रतिदीन 35000 रुपये दिले जातात.
दरम्यान, यादीतील सर्व 14 खेळाडू भारताच्या पहिल्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होते. वैंगणकर यांनी शार केलेल्या या शीटवर नजर टाकता आपणास दिसते की गोष्टी कशा आणि किती बदलल्या आहेत.