Kane Williamson New Record: केन विल्यमसनने स्टीव्ह स्मिथच्या विक्रमाची केली बरोबरी, आणखी एक शतक झळकावून केला मोठा विक्रम
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध माऊंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केन विल्यमसनने शानदार शतक झळकावून संघाला विजयाकडे नेले.
Kane Williamson Century: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने (Kane Williamson) कसोटी क्रिकेटमध्ये आणखी एक शतक झळकावून मोठी कामगिरी केली आहे. त्याने आता सर्वाधिक शतकांच्या बाबतीत स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) विक्रमाची बरोबरी केली आहे. स्टीव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन या दोघांची कसोटी क्रिकेटमध्ये 32-32 शतके आहेत. तथापि, केन विल्यमसनने स्टीव्ह स्मिथपेक्षा कमी डाव खेळून 32 कसोटी शतके पूर्ण केली आहेत आणि तो सर्वात वेगवान 32 कसोटी शतके करणारा फलंदाज बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध माऊंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात केन विल्यमसनने शानदार शतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. केन विल्यमसनने शानदार फलंदाजी करत न्यूझीलंडला विजयासाठी 267 धावांचे आव्हान दिले होते आणि त्यामुळेच किवी संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.
केन विल्यमसनने स्टीव्ह स्मिथची केली बरोबरी
केन विल्यमसनचे हे कसोटी क्रिकेटमधील 32 वे शतक असून त्याने स्टीव्ह स्मिथच्या 32 शतकांची बरोबरी केली आहे. याशिवाय केन विल्यमसनने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. घरच्या भूमीवर सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये त्याने आता डॉन ब्रॅडमन आणि जो रूट यांना मागे टाकले आहे. केन विल्यमसनचे हे न्यूझीलंडच्या भूमीवर 19 वे शतक आहे आणि या बाबतीत त्याने ब्रॅडमन आणि जो रूट यांना मागे टाकले आहे, ज्यांनी घरच्या भूमीवर प्रत्येकी 18 शतके झळकावली होती. (हे देखील वाचा: Sarfaraz Khan Debut: शेवटी बापालाच काळजी! सरफराज खानच्या वडिलांनी मुलासाठी कर्णधार रोहित शर्माला केली खास विनंती (Watch Video)
सर्वात वेगवान 32 कसोटी शतके
- 172 डाव – केन विल्यमसन
- 174 डाव – स्टीव्ह स्मिथ
- 176 डाव – रिकी पाँटिंग
- 179 डाव – सचिन तेंडुलकर
- 193 डाव – युनूस खान
- 195 डाव – सुनील गावस्कर
केन विल्यमसन जबरदस्त फार्ममध्ये
केन विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावली होती आणि आता दुसऱ्या सामन्यातही शतक झळकावले आहे. एकूणच, केन विल्यमसनने दोन सामन्यांत तीन शतके झळकावली आणि यावरून त्याचा सध्याचा फॉर्म किती उत्कृष्ट आहे हे दिसून येते. विल्यमसनच्या या शतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात सात गडी राखून शानदार विजय मिळवला. अशाप्रकारे न्यूझीलंडने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा कसोटी मालिकेत पराभव केला.