ENG vs NZ World Cup 2019 Final मॅचमध्ये जो रूट, केन विलियमसन यांना रोहित शर्मा याला मागे टाकण्याची संधी

या दोन्ही फलंदाजांना 100 किंवा जास्त धावांची गरज आहे रोहितला मागे टाकत सर्वाधिक धावा कारणासाठी. रोहितने 648 धावा केल्या आहेत.

जो रूट आणि केन विलियमसन (Image Credit:Getty Images)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषक आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. यजमान इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात फायनलचा थरार रंगणार आहे. इंग्लंड-न्यूझीलंड संघाचा सामना प्रतिष्टीत लॉर्ड्स (Lords) च्या मैदानावर रविवारी खेळाला जाणार आहे. यंदाच्या विश्वचषकमध्ये खेळाडूंनी अनेक दिग्गज क्रिकेटपटूंचे वनडे आणि विश्वकपमध्ये विक्रम मोडले आहेत. भारताचा उपकर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने यंदा सर्वांना मागे टाकत सर्वाधीक कपमध्ये 648 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (David Warner) 647 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. आणि आता विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात म्हणजेच फायनलमध्ये इंग्लंडचा जो रूट (Joe Root) आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) यांना रोहित याला मागे टाकण्याची संधी आहे. (विश्वचषकमध्ये पराभवानंतर भारतीय संघात फूट; विराट कोहली आणि रोहित शर्मा गटात विभाजित झाली टीम इंडिया)

यंदाच्या विश्वचषक सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत रोहित पहिले, वॉर्नर दुसऱ्या तर रूट आणि विलियमसन अनुक्रमाने चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. रूटने 549 धावा तर विल्यम्सनने 548 धावा केल्या आहेत. आता या दोन्ही फलंदाजांना 100 किंवा जास्त धावांची गरज आहे रोहितला मागे टाकत सर्वाधिक धावा कारणासाठी.

रविवारच्या ब्लॉकबस्टर फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड संघ पहिल्या विश्वचषकचे विजेतेपदासाठी मैदानात उतरतील. अंतिम सामना 14 जुलैला क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर होणार आहे. इंग्लंड संघाने 1992 नंतर पहिल्यांदा विश्वकपचे फायनल गाठले आहे.



संबंधित बातम्या