Jasprit Bumrah Emulates Anil Kumble: जसप्रीत बुमराहच्या लेग स्पिन गोलंदाजीवर अनिल कुंबळेही फिदा, पहा काय म्हणाले जंबो (Watch Video)
बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला ज्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या 'जंबो'च्या गोलंदाजीची अचूक नक्कल करताना दिसत आहे. बुमराहच्या गोलंदाजीची लाईन आणि लेन्थ कुंबळेप्रमाणेच आहे म्हणूनच तर खुद्द 'जंबो' देखील बुमराहच्या गोलंदाजीवर फिदा झाले आणि त्याचे कौतुक केले.
Jasprit Bumrah Emulates Anil Kumble: टीम इंडियाचे (Team India) माजी लेग स्पिनर आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनी आपल्या फिरकीच्या जोरावर भारतीय संघाला (Indian Team) अनेक सामने जिंकवून दिले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुंबळे यांनी संघासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. 2008मध्ये कुंबळेच्या निवृत्तीनंतर टीमला अद्याप प्रभावी लेग स्पिनर मिळालेला नाही जो विरोधी संघावर वर्चस्व गाजवू शकेल. बीसीसीआयने (BCCI) एक व्हिडिओ शेअर केला ज्यात टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) टीम इंडियाच्या 'जंबो'च्या गोलंदाजीची अचूक नक्कल करताना दिसत आहे. बुमराहच्या गोलंदाजीची लाईन आणि लेन्थ कुंबळेप्रमाणेच आहे म्हणूनच तर खुद्द 'जंबो' देखील बुमराहच्या गोलंदाजीवर फिदा झाले आणि त्याचे कौतुक केले. "आपण जसप्रीत बुमराहचे यॉर्कर आणि जलद बाऊन्सर बघितले आहेत. आता त्याची ही अनोखी ऍक्शन पाहा. तो महान बॉलर कुंबळेची नक्कल करत आहे आणि ते त्याने उत्तम प्रकारे केलं," असं कॅप्शन देत बीसीसीआयने व्हिडिओ शेअर केला. (IND vs ENG Test 2021: इंग्लंड खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराहची दहशत, पहा इंग्लिश ओपनर Rory Burns काय म्हणाला)
बीसीसीआयच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देत कुंबळेने लिहिले: “वेल बूम. खूप जवळ. आपल्या शैलीचे अनुकरण करणाऱ्या युवा वेगवान गोलंदाजांच्या पुढील पिढीसाठी आपण प्रेरणा आहात. आगामी मालिकेसाठी हार्दिक शुभेच्छा." कुंबळे सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) किंग्ज इलेव्हन पंजाबचे मुख्य प्रशिक्षक आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शानदार कामगिरी करणाऱ्या बुमराहवर आता इंग्लंडविरुद्ध मालिकेत याची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान असेल. विशेष म्हणजे बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या सर्व 17 टेस्ट परदेशातल्या आहेत आणि इंग्लंडविरुद्ध तो पहिल्यांदाच भारत टेस्ट सामना खेळेल. पहा व्हिडिओ
खेळाचा एक दिग्गज माणूस कुंबळेने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या स्वरूपात कुंबळेने 619 विकेट घेतल्या आहेत. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या 800 आणि ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नच्या 708 नांतर कसोटीमध्ये तिसऱ्या सर्वाधिक सर्वाधिक विकेट घेतल्या आहे. इतकंच नाही तर इंग्लंडच्या जिम लेकर यांच्यानंतर कसोटी सामन्याच्या डावात सर्व दहा विकेट घेणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील कुंबळे हा फक्त दुसरा गोलंदाज आहे. 1999 मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमवर त्याने पाकिस्तानविरुद्ध पराक्रम केला होता. कुंबळेनंतर एकही गोलंदाज डावात सर्व 10 विकेट घेऊ शकलेला नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)