Jasprit Bumrah-Sanjana Ganesan Wedding: जसप्रीत बुमराह व संजना गणेशन अडकले विवाहबंधनात, पहा लग्नाचे खास फोटो (See Photos)
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज गोव्यात स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल संजना गणेशनशी (Sanjana Ganesan) विवाहबंधनात अडकला. बुमराह आणि संजनाने त्यांचे जवळचे नातेवाईक आणि खास मित्रांच्या साथीने एकमेकांच्या गळ्यात माळ घातली
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज गोव्यात स्पोर्ट्स अँकर आणि मॉडेल संजना गणेशनशी (Sanjana Ganesan) विवाहबंधनात अडकला. बुमराह आणि संजनाने त्यांचे जवळचे नातेवाईक आणि खास मित्रांच्या साथीने एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. गोव्यातील एका गुरुद्वारामध्ये हा विवाहसोहळा पार पडला. बुमराह आणि संजनाच्या विवाह सोहळ्यात कोरोना साथीची सर्व नियमांचे पालन केले गेले. बुमराह आणि संजना गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या वृत्ताबाबत सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. आज जसप्रीत बुमराहने स्वतः लागांचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. या बातमीनंतर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.
बुमराह जेव्हा चौथ्या आणि अंतिम कसोटी तसेच इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेमधून बाहेर पडला तेव्हापासूनच यामागे त्याचे लग्न हेच कारण असावे असा अनेकांनी अंदाज बांधला होता. यापूर्वी बातमी आली होती की जसप्रीत साऊथची अभिनेत्री अनुपमाशी लग्न करणार आहे. मात्र नुकतेच तारा शर्माने जसप्रीतसोबतच एक फोटो शेअर करत जसप्रीतचे शोवर आल्याबद्दल आभार मानले आणि संजना गणेशनसोबत होत असलेल्या लग्नाबद्दल शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर जसप्रीत व संजनाच्या लग्नावर शिक्कामोर्तब झाले. (हेही वाचा: Harbhajan Singh आणि Geeta Basra पुन्हा होणार आई-बाब; गीताने खास फॅमिली फोटोच्या माध्यमातून शेअर केली गूडन्यूज)
दरम्यान, संजना गणेशनबद्दल बोलायचे झाले तर, ती साधारण 28 वर्षांची आहे आणि तिचा जन्म पुण्यात झाला आहे. संजनाने पुणे विद्यापीठातूनच अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. त्यानंतर ती मॉडेलिंगच्या दुनियेत आली. 2014 मध्ये ती मिस इंडियाच्या फायनलमध्येही पोहोचली होती. याआधी, गणेशनने 2013 मध्ये फेमिना गॉर्जियसचा किताब जिंकला आहे. यासह तिने एमटीव्हीचा रिअॅलिटी शो स्पिलिट्स व्हिलाद्वारे टीव्हीवर डेब्यू केला होता. आता संजना गणेशन क्रिकेट चाहत्यांना क्रीडा अँकर म्हणून परिचित आहे. युएईमध्ये झालेल्या आयपीएल 2020 दरम्यान ती टीव्हीवर बरीच दिसली होती.