West Indies Cricket: वेस्ट इंडिज क्रिकेट समोर आर्थिक संकट; वर्षअखेरीस इंग्लंडला विंडीज दौरा करण्याचे जेसन होल्डरने आमंत्रण, स्थिती सुधारण्यास होईल मदत

होल्डर इंग्लंडकडून मदतीसाठी विचारले. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी गेली काही वर्षे आर्थिकदृष्ट्या कठीण होती हे देखील होल्डरने कबूल केले.

जेसन होल्डर आणि जो रूट (Photo Credit: Getty)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) सुमारे चार महिन्यांच्या ब्रेकनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आणि इंग्लंडविरुद्ध (England) या ऐतिहासिक मालिकेत वेस्ट इंडिजने (West Indies) विजयी पदार्पण केले. पण पहिली कसोटी जिंकल्यानंतर विंडीजने शेवटचे दोन्ही सामने गमावले आणि त्याच मालिकेचा ताबा गमावला. तिसर्‍या कसोटी सामन्यात वेस्ट इंडीजला 299 धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने (Jason Holder) मोठी गोष्ट सांगितली जेणे सर्वांचे लक्ष वेस्ट इंडीज क्रिकेटकडे वळवले. होल्डर इंग्लंडकडून मदतीसाठी विचारले. वेस्ट इंडिज क्रिकेटसाठी गेली काही वर्षे आर्थिकदृष्ट्या कठीण होती हे देखील होल्डरने कबूल केले. कॅरिबियन कर्णधार म्हणाला की, इंग्लंडने या वर्षाच्या अखेरीस वेस्ट इंडिज दौर्‍यावर विचार केला पाहिजे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करावी. (ENG vs WI 3rd Test: वेस्ट इंडिजविरुद्ध निर्णायक सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या विक्रमी कामगिरीने जुळला अनोखा योगायोग, इंग्लंडने नोंदवला दणदणीत विजय)

जगातील दुसर्‍या क्रमांकाचा कसोटी अष्टपैलू खेळाडू होल्डरने कबूल केले की वेस्ट इंडीजला त्यांच्या क्रिकेटसाठी वित्तपुरवठा करण्यात अडचण येत आहे. यामध्ये टीम ए चा दौरा आणि डेव्हलपमेंट प्रोग्रामचा समावेश आहे. वेस्ट इंडिज खेळाडूंच्या पगारावर विशेषत: आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झालेल्या ऐतिहासिक इंग्लंडविरुद्ध मालिकेसाठीदौर्‍यावर येण्यापूर्वी 50 टक्के कपात करण्यात आली होती. मायदेशी परतल्यानंतर वेस्ट इंडीजचे खेळाडू कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार असले तरी त्यांचे आंतरराष्ट्रीय कॅलेंडर अनिश्चित आहे. "मी आमचे मुख्य कार्यकारी जॉनी ग्रेव्ह यांच्याशी बोलत होतो ज्यांनी इंग्लंड आणि भारतविरुद्ध (घरी) खेळून पैसे कमावता येतात असे म्हटले. कदाचित आम्ही ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानशीही ब्रेक करू. पण इतर संघांविरुद्ध आम्ही पैसे गमावतो," असे होल्डरने द गार्डियनला सांगितले.

होल्डर म्हणाला की, त्यांचे बोर्ड केवळ इंग्लंड आणि भारत यांचे आयोजन करून कमाई करू शकतात. म्हणूनच होल्डरने इंग्लंड बोर्डाला वर्षअखेरीस वेस्ट इंडिजचा दौरा करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, या दौऱ्याआधी वेस्ट इंडीज क्रिकेटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) कडून थकीत पैशांपूर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ईसीबी) 3 मिलियन डॉलर्सचे ब्रिजिंग कर्ज घेतले.