
IPL 2025: वाढत्या लष्करी तणावानंतर भारत आणि पाकिस्तानने (IND vs PAK) एकमताने युद्धबंदीवर सहमती दर्शविली. यानंतरच आयपीएल 2025 पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला, कारण जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला तेव्हा आयपीएल 2025 ला मध्येच थांबवण्यात आले. आता आयपीएल 2025 चे नवीन वेळापत्रक आले आहे. यामध्ये 17 मे पासून सामने सुरू होतील आणि अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल. पण याआधीही क्रिकेट साउथ आफ्रिकेने आयपीएलला मोठा धक्का दिला आहे.
क्रिकबझच्या अहवालानुसार, आयपीएल 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील एकूण 20 खेळाडू सहभागी होत आहेत. यापैकी 8 खेळाडूंची दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघात निवड झाली आहे, जी 3 जूनपासून होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025 च्या अंतिम फेरीत सहभागी होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना लक्षात घेऊन, क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला त्यांचे खेळाडू 26 मे पर्यंत परतायचे आहेत. लवकर परतल्याने खेळाडूंना तयारी करण्याची अधिक संधी मिळेल.
'या' संघांना बसणार मोठा धक्का
2025 च्या आयपीएलमध्ये खेळलेल्या 8 दक्षिण आफ्रिकन खेळाडूंची 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी कसोटी संघात निवड झाली आहे. त्यात कॉर्बिन बॉश (मुंबई इंडियन्स), वियान मुल्डर (सनरायझर्स हैदराबाद), मार्को जॅन्सन (पंजाब किंग्ज), एडेन मार्कराम (लखनऊ सुपरजायंट्स), लुंगी एनगिडी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), कागिसो रबाडा (गुजरात टायटन्स), रायन रिकेल्टन (मुंबई इंडियन्स) आणि ट्रिस्टन स्टब्स (दिल्ली कॅपिटल्स) यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, लखनौ सुपर जायंट्स, आरसीबी, गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या खेळाडूंनी आयपीएलच्या मध्यभागी सोडल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसेल.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड म्हणाले की, आयपीएल आणि बीसीसीआयसोबत सुरुवातीचा करार असा होता की अंतिम सामना 25 मे रोजी होईल, आमचे खेळाडू 26 तारखेला परततील. आमच्या दृष्टिकोनातून काहीही बदललेले नाही. क्रिकेट संचालक (एनोक एनक्वे) आणि फोलेत्सी मोसेकी (सीएसए सीईओ) यावर चर्चा करत आहेत. ते म्हणाले की आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत आणि मागे हटणार नाही.
सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
सनरायझर्स हैदराबाद संघ आयपीएल 2025 मध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण त्यानंतर, लीग टप्प्यात त्यांचे अजूनही तीन सामने शिल्लक आहेत, जे त्यांना एलएसजी, आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळायचे आहेत. लीग टप्प्यातील त्यांचा शेवटचा सामना 25 मे रोजी केकेआर विरुद्ध आहे. अशा परिस्थितीत, शेवटचा लीग सामना खेळल्यानंतर मुल्डर परत येऊ शकतो.