IPL Racism: डॅरेन सॅमीला इशांत शर्माने म्हटले होते 'काळू', वर्णद्वेषाचा आरोप केल्यावर जुनी इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
आणि आता सॅमीच म्हणणं खरं ठरताना दिसत आहे. सोशल मीडियावर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माची एक जुनी इन्स्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल होते आहे. ज्यात इशांतने सॅमीचा उल्लेख 'काळू' असा केला आहे.
काही दिवसांपासून वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी (Darren Sammy) चर्चेचा विषय बनला आहे. सॅमीएन आयपीएलमधील माजी टीम सनरायझर्स हैदराबादवर वर्णद्वेषाचा (Racism) आरोप केला. अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय इसमाच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आहे. यात सॅमीने उडी मारली आणि आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघाकडून खेळत असतानाही आपल्यावर वर्णद्वेषी टोमणे सहन करावे लागले असं सॅमीने म्हटलं. आणि आता सॅमीच म्हणणं खरं ठरताना दिसत आहे. सोशल मीडियावर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माची (Ishant Sharma) एक जुनी इन्स्टाग्राम पोस्ट सध्या व्हायरल होते आहे. 2014 च्या या पोस्टमध्ये इशांतने भुवनेश्वर कुमार, सॅमी, डेल स्टेनसोबतचा एक फोटो पोस्ट केला ज्यात इशांतने सॅमीचा उल्लेख 'काळू' असा केला आहे. शिवाय सॅमीचीही एक पोस्ट व्हायरल झाली आहे ज्यात तो स्वतःला डार्क काळूबद्दल बोलला. (Darren Sammy on Racism: डॅरेन सॅमीने माजी SRH संघावर लगावले वर्णद्वेषाचे आरोप, व्हिडिओद्वारे साथीदारांचा पर्दाफाश करण्याची दिली चेतावणी)
हे ट्विट 1 नोव्हेंबर, 2014 रोजी पोस्ट केले गेले, जेव्हा वेस्ट इंडियन क्रिकेटपटूने व्हीव्हीएस लक्ष्मणच्या (VVS Laxman) वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहिले की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्हीव्हीएस लक्ष्मण, देव तुला आशीर्वाद देवो. #बेस्टड्रेसर अरे डार्क काळू आठवतो.” ट्विटच्या अखेरीस त्याने हसणारे इमोजीस दिल्या.दुसरीकडे,इशांतची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्स इशांतला माफी मागण्याचा आग्रह करत आहेत. सॅमी आणि शर्माने शेअर केलेले पोस्ट पाहा:
सॅमीने पोस्ट केलेले ट्विट
इशांत शर्मा
View this post on Instagram
Me, bhuvi, kaluu and gun sunrisers
A post shared by Ishant Sharma (@ishant.sharma29) on
इशांतची पोस्ट व्हायरल झाल्यावर यूजर्सने त्याला पोस्ट डिलीट करण्याचा सल्ला दिला.
यापूर्वी, “मी आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असताना मला 'काळू' या नावाने हाक मारायचे. मला आता त्या शब्दाचा अर्थ कळतो आहे. मला आणि थिसारा परेराला संघात 'काळू' नावाने बोलावलं जायचं. मला वाटलं हा कुठलातरी चांगला शब्द असेल.” हे समजल्यावर मला आणखीनच दुःख झाल्याचं सॅमीने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये म्हटलं.